Tuition For Children : मुलांना ट्युशन लावण्याआधी 'या' गोष्टी लक्षात घ्या, नाहीतर प्रगतीवर होईल परिणाम

Parenting Tips : आजकालच्या स्पर्धात्मक युगात प्रत्येक पालकाला आपल मुलं हुशार आणि करिअरमध्ये यशस्वी झालेल पाहायच असतं. त्यामुळे पालक मुलांना लहानपणापासून शाळेसोबत ट्युशन लावतात. पण याची नक्की गरज आहे का? जाणून घेऊयात.
Parenting Tips
Tuition For ChildrenSAAM TV
Published On

धावपळीच्या जगात पालकांना त्यांच्या कामातून मुलांसाठी वेळ काढता येत नाही. मुलांनी पालकांना त्रास देऊ नये किंवा हट्ट करू नये म्हणून पालक सर्व मनोरंजनाच्या गोष्टी मुलांना घेऊन देतात. पण यामुळे मुलांच्या मानसिकतेवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळते.

सगळ्या पालकांना आपल्या मुलांनी चांगले शिकून मोठं व्हावं अस वाटत असते. कारण अगदी लहानपणापासूनच मुलांची स्पर्धा सुरु होते. या स्पर्धेत आपल्या मुलांनी प्रथम यावे अस प्रत्येक पालकाला वाटत. पण मुलांना पुरेसा वेळ देता येत नसल्यामुळे पालक मुलांना ट्युशनला घालतात आणि त्यांच्या प्रगतीची अपेक्षा करतात. पण खरंच तुमच्या मुलाला ट्युशनची गरज आहे का? आणि असल्यास ट्युशन लावताना कोणत्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे जाणून घेऊयात.

लहान मुलांना ट्युशनला कधी घालावे?

  • शाळेत शिकवले समजत नसल्यास तुम्ही मुलांना ट्युशनला घालू शकता.

  • शाळेतील परिक्षेत वारंवार कमी गुण मिळत असतील.

  • शाळेतील अभ्यास घरी करण्यास मुलांना अडचण येत असल्यास ट्युशन योग्य आहे.

  • अभ्यासाची रुची वाढवण्यासाठी लहान मुलांना ट्युशनला घालावे.

मुलांसाठी ट्युशन निवडताना कोणती काळजी घ्यावी?

  • शाळेत मुलांना जे विषय समजण्यास अडथळे येतात किंवा ज्या विषयात कमी गुण मिळतात. अशा विषयांसाठी ट्युशन लावा.

  • ट्युशन निवडताना पालकांनी शिक्षकाची पात्रता समजून घेऊनच निवड करावी.

  • ट्युशन लावताना कधीही पालकांनी शिक्षकापासून मुलांच्या अभ्यासाच्या गोष्टी लपवू नये. मुलांची सद्य स्थिती नीट समजावून सांगावी.

  • ट्युशन कधीही घराच्याजवळ पाहावे. यामुळे मुलांचा वेळ वाचतो.

  • टयुशनबद्दल इतर मुलांचे आणि पालकांचे अमुभव जाणून घ्या.

Parenting Tips
Special Report : हेल्थ ड्रिंगमुळे लहान मुलांना हार्ट अटॅकचा धोका? 'त्या' व्हायरल मॅसेमागचं खरं सत्य काय?

मुलांना ट्युशनला कधी घालावे?

  • तुमचे मुलं घरी नीट अभ्यास करत असेल. परिक्षेत चांगले गुण मिळवत असेल तर त्यांना ट्युशन लावू नका.

  • पालकांनी मुलांना वेळ द्या आणि अभ्यासात मदत करा. म्हणजे तुम्हाला मुलांची प्रगती समजेल. मुलांची उजळणी घ्या.

  • तुम्हाला जर मुलांच्या अभ्यासात लक्ष द्यायला वेळ मिळत नसेल आणि अपूऱ्या अभ्यासामुळे मुलांच्या परीक्षेतील गुणांवर फरक पडत असेल तर मुलांना ट्युशन लावा.

डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे.

Parenting Tips
Watching Cartoon Side Effects : तुमची मुलं सतत कार्टून बघतायत? सावधान, होऊ शकतात हे गंभीर आजार

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com