Parent-Child Relationship : मुलांसोबत आपले नाते अधिक घट्ट करण्यासाठी पालकांनी फॉलो करा 'या' टिप्स

कामाच्या गडबडीमुळे पालक व मुलांमध्ये दूरावा निर्माण होत आहे.
Parent-Child Relationship
Parent-Child Relationship Saam Tv

Parent-Child Relationship : हल्लीच्या व्यस्त जीवनशैलीमुळे पालकांना मुलांसाठी हवा तसा वेळ देता येत नाही. त्यातच पालक जर काम करणारे असतील तर ही परिस्थिती आणखीनच कठीण होते. कामाच्या गडबडीमुळे पालक व मुलांमध्ये दूरावा निर्माण होत आहे. सुट्टीच्या दिवशी किंवा घरी आल्यानंतरही पालक मुलांना वेळ देत नाही. अशातच मुलांमध्ये नैराश्य, चिंता व मानसिक ताण अधिक प्रमाणात आढळून येत आहे.

या परिस्थितीत आपल्या मुलांवरही या सगळ्या गोष्टींचा परिणाम होऊ नये यासाठी पालकांनी आधीच खबरदारी घ्यायला हवी. आपले नाते मुलांसोबत मजबूत बनवण्यासाठी काही टिप्स देखील फॉलो करू शकता. जाणून घेऊया त्याबद्दल

Parent-Child Relationship
Child Teeth Care : मुलांच्या दातांसाठी 'हे' पदार्थ 'वाईट'च !

1. मुलांचे लाड करा -

मुलांना (Child) विशेष वाटेल असे काहीतरी पालकांनी करायला हवे. असा उपक्रम करा जेणेकरून त्यांना कळेल की तुम्ही त्यांच्यावर किती प्रेम करता, जसे की त्यांच्यासाठी एक नोट लिहा. त्यांच्याबद्दल छान गोष्टी सांगा. त्यांच्यावर खूप प्रेम करा. यामुळे मुले आजारी पडण्याची शक्यताही कमी होते.

2. दिवस कसा गेला हे विचारा -

मुलांना त्यांचा दिवस कसा गेला हे जरूर विचारावे. याच्या मदतीने तुम्ही मुलांच्या समस्या सोडवू शकाल. त्यांना कोणत्याही समस्येतून बाहेर पडण्यास मदत होईल. यामुळे मुले तुमच्या जवळ येतील.

Parent-Child Relationship
Parent-Child Relationship Canva

3. एकत्र खेळा -

तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून थोडा वेळ (Time) काढून मुलांना द्या. त्यांच्यासोबत त्यांच्या आवडत्या उपक्रमात सहभागी व्हा. त्यांच्याबरोबर खेळा. यामुळे मुलांना तुमच्याशी जोडलेले वाटेल.

4. जेवण करा -

मुलांसोबत जेवण करा. यामुळे तुम्ही त्यांच्यासोबत दर्जेदार वेळ घालवू शकाल. मुलांसोबत दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण किंवा नाश्ता घरीच करा. याशिवाय वीकेंडला तुम्ही त्यांना लंच किंवा डिनरसाठी बाहेर घेऊन जाऊ शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com