Ovarian cancer : सावधान ! ग्रामीण भागात का वाढतोय गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग ? 'ही' आहेत लक्षणे

वाढत्या वयानुसार आपल्या शरीरामध्ये अनेक बदल होत असतात. या समस्यांकडे आपण दुर्लक्ष करतो.
ovarian cancer
ovarian cancer Saam Tv

Uterine Cancer : वाढत्या वयानुसार आपल्या शरीरामध्ये अनेक बदल होत असतात. या समस्यांकडे आपण दुर्लक्ष करतो. बदलत्या जीवनशैलीनुसार आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी बद्दल्या आहेत.

अलीकडे स्तनांच्या, गर्भाशयाच्या व बीजांडाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढू लागले आहे. गर्भाशयाच्या कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत. त्यातील गर्भाशयाच्या पोकळीच्या आवरणाचा कर्करोग (एंडोमेट्रियम) सगळ्यात जास्त आढळून येतो.

ovarian cancer
Stomach Cancer : सतत पोट दुखतयं ? 'ही' लक्षणे तर दिसत नाही ना, असू शकतो पोटाचा कर्करोग

गेल्या काही वर्षात ग्रामीण भागातील महिलांमध्ये गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण भागात दरवर्षी जवळपास एक लाख महिलांमध्ये गर्भाशय मुखाचा कर्करोग आढळून येतो. त्यापैकी बऱ्याचशा रुग्णांना उपचाराअभावी जीव गमवावा लागतो.

कर्करोग बरा होण्यासाठी वेळीच निदान होणे अत्यंत आवश्यक असते. पण त्या संबंधीत चाचण्यांची सोय ग्रामीण भागात नसल्यामुळे अनेकदा आजाराच्या निदानात विलंब होतो. त्यामुळे वेळेत निदान न झाल्याने हा आजार वाढल्याची अनेक उदाहरणे दिसून येतात तर बहुतांश रुग्ण उपचारासाठी मुंबईसारख्या शहराकडे धाव घेताना दिसतात.

ovarian cancer
White Pepper Benefits : रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करायचे आहे तर, पांढऱ्या मिरीचे होतील अनोखे फायदे

गर्भाशय मुखाचा कर्करोग स्त्रियांमधील गर्भाशय मुखाच्या पेशींवर परिणाम करतो. ग्रीवा हा गर्भाशयाच्या खालचा भाग आहे जो योनीला जोडलेला असतो. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग या भागाच्या पेशींवर परिणाम करतो. दुर्दैवाने गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची कोणतीही लक्षणे सुरुवातीच्या टप्प्यात दिसत नाहीत. जेव्हा कर्करोग प्रगत अवस्थेत पोहोचतो तेव्हा त्याची लक्षणे दिसू लागतात. म्हणून, नियमित तपासणी करणे आवश्यक आहे, जेणेकरुन रोग लवकरात लवकर ओळखता येईल.

एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूटचे ऑन्कोलॉजिस्ट आणि हेमॅटो-ऑन्कोलॉजिस्ट डॉ. सुहास आग्रे सांगतात की,

एचपीव्ही लसीकरणामुळे जागतिक स्तरावरील गर्भाशय मुखाच्या कर्करोगात घट झाली आहे, हे वास्तव आहे. भारतात या कर्करोगाचे प्रमाण हे अल्प उत्पन्न गटांतील महिलांमध्ये अधिक आहे. विशेषत: सरकारी रुग्णालयांमध्ये अशा रुग्ण महिला मोठय़ा प्रमाणावर पाहायला मिळतात. एकदा गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोगाचा विकास झाल्यानंतर, पहिल्या टप्प्यात रोगात रेडिओथेरपी आणि केमोथेरपीशिवाय किंवा त्याशिवाय शस्त्रक्रिया समाविष्ट केली जाते. उच्च टप्प्यात शस्त्रक्रिया उपयुक्त नसतात आणि रेडिओथेरपी आणि केमोथेरपीद्वारे सर्वोत्तम उपचार केले जातात.

लक्षणे -

१. मासिक पाळीत अनियमितता, मासिक पाळीच्या व्यतिरिक्त रक्तस्त्राव, संभेग केल्यानंतर रक्तस्त्राव, रजोनिवृत्तीनंतर रक्तस्त्राव, दुर्गंधीयुक्त स्त्राव, इत्यादी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची लक्षणे आहेत.

२. लैंगिक संक्रमित संसर्ग आणि एचआयव्हीमुळे देखील एचपीव्ही संसर्गाचा धोका वाढतो. तसेच, धूम्रपानामुळेही धोका वाढतो.

ovarian cancer
Women Health : लठ्ठपणा असलेल्या महिलांना होऊ शकतो स्तनाचा कर्करोग, जाणून घ्या कोणत्या पदार्थाचे सेवन करायला हवे

३. स्वच्छतेचा अभाव, जागृतीचा अभाव आणि वेळेवर तपासणी न केल्यामुळे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे (Cancer) प्रमाण शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात जास्त आहे.

४. बहुतेक वेळा हा आजार (Disease) अनुवंशिकतेमुळे देखील होतो. तसेच, पोट फुगणे किंवा सुजणे, जेवताना पोट भरल्यासारखे वाटणे, अचानक वजन कमी होणे, सतत लघवी होणे यांसारखा लक्षणे दिसू लागतात.

ही लक्षणे दिसू लागल्यावर वेळीच निदान व तपासण्या करा. तसेच डॉक्टरांचा सल्ला देखील घ्या.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com