White Pepper Benefits : रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करायचे आहे तर, पांढऱ्या मिरीचे होतील अनोखे फायदे

पांढरी मिरी आपल्या शरीराच्या अनेक सामान्य आजारांपासून ते कर्करोगापर्यंतच्या गंभीर आजारांपासून आपल्याला मदत करते. तर या पांढरी मिरीचे फायदे कसे होतात जाणून घ्या.
White Pepper Benefits
White Pepper Benefits saam tv

White Pepper Benefits : स्वयंपाकघरात वापरला जाणारा पदार्थ पांढरी मिरी. ही शक्यतो चवीसाठी आणि गरम मसाल्यात वापरली जाते‌. परंतु, ही फक्त आपल्या स्वयंपाकघरात अन्नाची चव वाढविण्यासाठी मदत करते असे नाही तर, ती आपल्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. काही लोक याला दख्खनी मिरची या नावाने देखील ओळखतात. ज्यांचे चमत्कारीक गुणधर्म रामबाण उपाय म्हणून काम करतात. यासह, पांढरी मिरी आपल्या शरीराच्या अनेक सामान्य आजारांपासून ते कर्करोगापर्यंतच्या (Cancer) गंभीर आजारांपासून आपल्याला मदत करते. तर या पांढरी मिरीचे फायदे कसे होतात जाणून घ्या.

White Pepper Benefits
Stylish Blouse Designs : साडीवरचा ब्लाउज शिवायचा आहे ? 'या' गोष्टी लक्षात ठेवा, दिसाल खूप झक्कास !

आयुर्वेदात पांढरी मिरी एक औषधी वनस्पती मानली जाते. त्यात फ्लेवोनोइ, जीवनसत्त्वे, लोह आणि बरेच पौष्टिक पदार्थ असतात, जे शरीरासाठी फायदेशीर असतात. ज्यांना डोळ्यांच्या समस्या जाणवता, त्यांनी यांचे सेवन करावे तसेच, मोतीबिंदूसारख्या समस्यांसाठी देखील हे उपयुक्त मानले जाते.

पांढरी मिरी किंवा दख्खनी मिरची खाल्ल्याने शरीरातील विषारी घटक शरीराबाहेर पडतात. ज्याचा हृदयाला फायदा होतो. ते सेवन केल्याने हृदय निरोगी राहते आणि हृदयरोग होण्याची शक्यता बर्‍याच प्रमाणात कमी होते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी पांढरी मिरचीचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते. कारण पांढर्‍या मिरीमध्ये मधुमेहविरोधी प्रभाव आढळतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.

पोटातील गॅसपासून आराम मिळवण्यासाठी पांढर्‍या मिरचीचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते . कारण पांढऱ्या मिरीमध्ये पाइपरिन नावाचे तत्व असते, जे गॅस कमी करण्यास मदत करते. कोशिंबीरची पावडर टाकून रोज नियमित सेवन केल्यास पचन शक्ती देखील बळकट होते आणि पोटदुखी, ऍसिडिटी, बद्धकोष्ठता, अल्सर सारख्या आजारांमध्ये आराम मिळतो. हे पोटात हायड्रोक्लोरिक ऍसिड (गॅस्ट्रिक ऍसिड) चे उत्पादन देखील उत्तेजित करते, जे पचन विकारांपासून मुक्त होण्यास मदत करते.

पांढरी मिरचीचे सेवन केल्याने वजन कमी करण्यास देखील मदत होते. त्याचा काढा प्यायल्याने केवळ रोग प्रतिकारशक्तीच वाढत नाही, तर वजनही नियंत्रणात राहते. यात कॅप्साइसिन आहे जे, चरबी बर्न करण्यात मदत करते.

White Pepper Benefits
Soaked Walnuts Benefits: भिजवलेल्या अक्रोडाचे आरोग्यासाठी आहेत अनेक फायदे, गर्भवती महिलांनी तर अवश्य खायलाच हवे!

कॅप्साइसिन सामग्री शरीरातील कर्करोगाच्या पेशी नष्ट करू शकते. प्रोस्टेट कर्करोग बरा करण्यासाठी ही पांढरी मिरी प्रभावी आहे. जीवनसत्त्वे, लोह, अँटी-ऑक्सिडेंट इत्यादी पौष्टिक पदार्थ त्यात आढळतात. म्हणून, दररोज त्याचे सेवन केल्यास ते शरीरात कर्करोगाच्या पेशींच्या निर्मितीवर नियंत्रण ठेवते.

दख्खनी मिरची किंवा पांढरी मिरीमध्ये असलेले पोषक तत्वे शारीरिक वेदना कमी करतात. हे शरीरात होणाऱ्या वेदनांपासून आराम देतात आणि दररोज याचे सेवन केल्याने स्नायूंमधली सूज व सांधेदुखी कमी होण्यास मदत होते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com