Soaked Walnuts Benefits: भिजवलेल्या अक्रोडाचे आरोग्यासाठी आहेत अनेक फायदे, गर्भवती महिलांनी तर अवश्य खायलाच हवे!

Soaked Walnut : या काळात महिला जे काही खातात त्याचा थेट परिणाम गर्भावर होत असतो. यासाठीच जास्तीत जास्त पोषक डाएट गरोदर महिलांना देण्यात येतो.
Soaked Walnuts Benefits
Soaked Walnuts BenefitsSaam TV

Soaked Walnuts Benefits: गरोदरपण हा प्रत्येक स्त्रीसाठी एक खास काळ असतो. या काळात तिच्या शरीरात आणि मनात अनेक बदल होत असतात. गरोदरपण (Pregnancy) हा एक सुंदर टप्पा असला तरी नाजूक आणि जोखमीचा देखील असतो. सहाजिकच या काळात काय खावं आणि खाऊ नये? असे प्रश्न महिलांसमोर निर्माण होतात.

या काळात महिला जे काही खातात त्याचा थेट परिणाम गर्भावर होत असतो. यासाठीच जास्तीत जास्त पोषक डाएट गरोदर महिलांना (Women) देण्यात येतो. या काळात गरोदर स्त्रीने सर्व प्रकारचे पोषक घटक मिळणारे पदार्थ खाल्ले तर बाळाची वाढ आणि विकास योग्य पद्धतीने होतो.

गरोदर स्त्रीच्या आहारात यासाठीच विविध प्रकारच्या भाज्या, फळं आणि सुकामेवा असायला हवा. कारण यातून तिला आणि बाळाला लोह, प्रोटिन्स, कॅल्शिअम, व्हिटॅमिन्स असे पोषक घटक सहज मिळत असतात.

Soaked Walnuts Benefits
Moong Daal Halwa Recipe : पचायला हलका व चविष्ट असा मुग डाळीचा हलवा !

दररोज सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले अक्रोड खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अक्रोडमध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म असतात. भिजवलेल्या अक्रोडचे सेवन गर्भवती महिलांसाठी फायदेशीर आहे.

अक्रोडांना ऊर्जेचे पॉवरहाऊस म्हणतात. अक्रोडमध्ये व्हिटॅमिन ई (Vitamin E), प्रोटीन, फायबर, ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, फॉस्फरस आणि फॉलिक अ‍ॅसिड भरपूर प्रमाणात असतात, जे शरीरासाठी फायदेशीर असतात. पण अक्रोड भिजवून त्याचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात.

कच्च्या अक्रोडांपेक्षा भिजवलेले अक्रोड जास्त फायदेशीर आहे. याशिवाय रोज सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेल्या अक्रोडाचे सेवन केल्याने अनेक आजार दूर होतात. तसेच, गर्भवती महिलांसाठी याचे सेवन करणे फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊया भिजवलेले अक्रोड खाण्याचे आरोग्यास होणारे फायदे

भिजवलेले अक्रोड खाण्याचे फायदे -

Soaked Walnuts Benefits
Muscle Strength Tips : स्नायूंच्या बळकटीसाठी हवे योग्य पोषण ? आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश

गर्भवती महिलांसाठी फायदेशीर -

अक्रोडमध्ये ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड मुबलक प्रमाणात आढळते. ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड्स न जन्मलेल्या बाळाच्या मेंदूच्या विकासात मदत करतात. डॉक्टरांच्या सल्ल्याने अक्रोडाचे सेवन करणे आई आणि न जन्मलेले बाळ दोघांसाठीही फायदेशीर ठरू शकते.

हृदय निरोगी ठेवण्यासाठी -

हृदय निरोगी ठेवण्यासाठी भिजवलेल्या अक्रोडाचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते. कारण अक्रोडमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असते, जे हृदयासाठी फायदेशीर असते. ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल कमी करून चांगले कोलेस्ट्रॉल तयार करण्यास मदत करतात, जे हृदयासाठी फायदेशीर आहे.

भिजवलेले अक्रोड खाणे पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. कारण अक्रोडमध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते, जे योग्य पचन राखण्यास मदत करते. तसेच याचे रोज सेवन केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होईल आणि पोटही बरोबर राहील. दररोज सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले अक्रोड खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. भिजवलेले आक्रोड खाल्ल्याने आरोग्याला होतात अनेक फायदे, बध्दकोष्ठतेचा त्रास असेल तर आजच खा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Shraddha Thik

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com