Online Scam: तुमच्या बँक बॅलन्सवर हॅकर्सची नजर; 'या' ट्रिक्सनं सुरक्षित ठेवा पैसा

Cybersecurity Tips 2025: जर तुम्हाला स्कॅमर्सपासून वाचायचे असेल तर तुम्हाला काही खबरदारी पाळावी लागेल. अ‍ॅप्स ब्राउझ करताना आणि इन्स्टॉल करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील.
Online Scam: तुमच्या बँक बॅलन्सवर हॅकर्सची नजर; 'या' ट्रिक्सनं सुरक्षित ठेवा पैसा
Published On
Summary
  • हॅकर्स फिशिंग ईमेल, बनावट लिंक आणि खोटे अ‍ॅप्स वापरून बँक बॅलन्सवर डल्ला मारतात.

  • ऑनलाइन पेमेंट करताना अधिकृत अ‍ॅप्स आणि सुरक्षित नेटवर्कचा वापर करणं आवश्यक आहे.

  • सुरक्षित पासवर्ड आणि दोन-स्तरीय सुरक्षा वापरल्यास खाते सुरक्षित राहते.

आजकाल बहुतेक लोकांच्या मनात हॅकर्सची दहशत आहे. आपल्यासोबत सायबर स्कॅम होईल. हॅकर आपला पैशांवर डल्ला मारेल, अशी भीती अनेकांच्या मनात आहे. ऑनलाइन पेमेंट करण्यापासून ते लिंकवर क्लिक करण्यापर्यंतच्या अनेक ट्रिकनं हॅकर आपल्याला गंडा घालत असतो. भारतात दररोज अनेक लोक विविध प्रकारच्या स्कॅमचे बळी पडतात. सरकार विविध प्रकारच्या घोटाळ्यांबद्दल नागरिकांना सावध करते. तरीही, लाखो लोक स्कॅमचे बळी पडतात.

दरम्यान तुम्हाला हॅकर्सची भीती असेन किंवा तुम्ही स्कॅमचा शिकार होऊ नये असं वाटत असेन पुरेशी दक्षता घेणं आवश्यक आहे. दक्षता तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतील, त्याची माहिती आपण जाणून घेऊ.

2FA टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन

व्हॉट्सअॅप असो किंवा फेसबुक, बहुतेक सोशल मीडिया अॅप्स आणि इतर प्लॅटफॉर्म 2FA (टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन) देतात. हे हॅकर्सना अॅपमध्ये किंवा तुमच्या खात्यात लॉग इन करण्यापासून रोखते. यामुळे तुमच्या खात्याची सुरक्षा दुप्पट वाढत असते. दरम्यान हे माहित असूनही लोक अनेकदा त्याकडे दुर्लक्ष करतात. हीच चूक क्यांना महागात पडते. प्रत्येक अॅप किंवा प्लॅटफॉर्मवर खाते तयार करताच तुम्ही 2FA सेट करण्याची सवय लावली पाहिजे.

फिशिंग मेसेज आणि ईमेल ओळखण्याची सवय

अनेकदा बातम्यांमध्ये अशा ईमेल आणि मेसेजपासून दूर राहण्याचा इशारा दिला जातो. लिंक्सवर क्लिक करण्याची चूक करू नका. पण कधीकधी घाईघाईने किंवा निष्काळजीपणामुळे तुम्ही अशा मेसेज आणि ईमेलला बळी पडता. त्यामुळे फिशिंग मेसेज आणि ईमेल ओळखणं शिकलं पाहिजे. ईमेल कुठून आलाय, किंवा येत आहे, हे प्रथम तपासण्याची सवय लावा. कंपनीचा पत्ता तपासा. त्यानंतरच रिप्लाय करा.

ब्राउझिंग लक्ष द्या

इंटरनेटवर ब्राउझिंग करताना बरेच लोक हॅकर्सचे शिकार बनतात. बहुतेक लोक कोणत्या वेबसाइटला भेट देत आहेत याकडे लक्ष न देता इंटरनेट सर्फ करतात. तुम्ही प्रथम URL तपासण्याची सवय लावा. जर URL https:// ने सुरू होत असेल तर ते एन्क्रिप्टेड कनेक्शन आहे आणि जर ते HTTP ने सुरू होत असेल तर ते नाही. सार्वजनिक वाय-फायवर असे अनेकदा घडते. म्हणून, ब्राउझ करताना प्रथम URL तपासण्याची सवय लावा.

VPN वापरण्याची सवय लावा

कॅफे, विमानतळ आणि हॉटेलमध्ये सार्वजनिक वाय-फाय वापरणे धोकादायक आहे. हे नेटवर्क फ्री असतात आणि बहुतेकदा एन्क्रिप्ट केलेले नसतात, त्यामुळे हॉकर्स सहजगत्या शिकार बनवतात. एक सामान्य पद्धत म्हणजे मॅन-इन-द-मिडल हल्ला, यात त्याच नेटवर्कवरील गुन्हेगार तुमच्या डिव्हाइस आणि इंटरनेटमधील रहदारीमध्ये अडथळा आणतो. तसेच तुम्ही इंस्टॉल केलेले प्रत्येक अॅप तुमच्या डेटा आणि हार्डवेअरमध्ये प्रवेश करण्यासाठी परवानगी मागते.

म्हणून तुम्ही किमान विशेषाधिकार नियमाचे पालन करण्याची सवय लावली पाहिजे. प्रत्येक अ‍ॅपला फक्त त्याला आवश्यक असलेला अ‍ॅक्सेस द्या. मॅप्स अ‍ॅप्सना फक्त वापरात असताना तुमचे लोकेशन आवश्यक असते. फोटो एडिटरना तुमचे फोटो आवश्यक असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com