Child Obesity: लठ्ठपणा लहान मुलांसाठी ठरतोय धोकादायक; स्थूलतेमुळे 'हे' गंभीर आजार होऊ शकतात

Child Obesity: लहान मुलांमध्ये लठ्ठपणाचं प्रमाण अधिक दिसून येतंय. लहान मुलांमध्ये वाढणाऱ्या लठ्ठणपणामुळे इतर अनेक समस्या वाढू शकतात. त्यानंतर ही परिस्थिती गंभीर रूप धारण करू शकते.
Child Obesity
Child Obesitysaam tv
Published On

भारतात लठ्ठपणाची समस्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतेय. केवळ मोठे व्यक्ती नाही तर लहान मुलांमध्ये देखील लठ्ठपणाचं प्रमाण अधिक दिसून येतंय. या समस्येकडे आता प्रत्येक पालकांनी गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजं. हे केवळ मुलाच्या आत्मविश्वासावरच परिणाम करत नाही तर उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल, सांध्यांच्या समस्या, नैराश्य आणि मधुमेह यासारख्या गंभीर आरोग्य समस्यांना आमंत्रण देतात.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, लहान मुलांमध्ये वाढणाऱ्या लठ्ठणपणामुळे इतर अनेक समस्या वाढू शकतात. त्यानंतर ही परिस्थिती गंभीर रूप धारण करू शकते. यासाठीच यावर वेळीच उपाय करणं गरजेचं आहे.

Child Obesity
Blocked Arteries: हृदयाच्या नसा बंद पडण्यापूर्वी शरीरात दिसतात 'हे' बदल; वेळीच तपासणी करून घ्या

नवी मुंबईतील खारघरच्या मदरहुड हॉस्पिटलमधील बालरोग आणि नवजात रोग तज्ज्ञ डॉ. संजू सिदाराद्दी यांच्या सांगण्यानुसार, लहान मुलांमधील लठ्ठपणा झपाट्याने वाढत असून हा एक चिंतेचा विषय ठरतोय. गेल्या काही वर्षांमंध्ये जगासह संपूर्ण भारतात मुलांमधील लठ्ठपणाचं प्रमाण अधिक वाढलंय. मुलांमध्ये लठ्ठपणासाठी विविध घटक कारणीभूत ठरू शकतात. बालपणातील लठ्ठपणाला कारणीभूत ठरणाऱ्या प्रमुख घटकांपैकी एक म्हणजे वाढता स्क्रीन टाइम .

डॉ. संजू यांना माहिती दिली की, अनेक मुलं घराबाहेर न जाता टिव्ही, व्हिडिओ गेम्स, टॅब्लेट आणि कॉम्प्युटरसमोर तासनतास घालवतात. हे त्यांच्या शारीरीक आरोग्यावर परिणाम करतं. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीं या विविध आरोग्य समस्यांना आमंत्रण देतात. यामुळे लठ्ठ मुलांना श्वास घेण्यात अडचणी, स्नायू आणि सांधेदुखी, मधुमेह, उच्च रक्तदाब,खराब कोलेस्टेरॉलची पातळी (LDL), हाडं फ्रॅक्चर, आतड्यांसंबंधी रोग (IBD), हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, किडनी समस्या यांसारख्या समस्या भेडसावण्याची समस्या असते. त्याचबरोबर भविष्यात थायरॉईड समस्या, तणाव, नैराश्य, आणि नॉन-अल्कोहोलिक फॅटी यकृत आजारंही उद्भवू शकतात.

लठ्ठ मुलांमध्ये भविष्यात होणारे आजार

टाईप 2 मधुमेह

हा एक सामान्य आजार असून ज्याचं निदान मुलांमध्ये विशेषतः लठ्ठपणाने ग्रस्त असलेल्या मुलांमध्ये दिसून येतं. या स्थितीत त्यांचे शरीर इन्सुलिनला प्रतिरोधक बनतं. इन्सुलिन हे एक प्रकारचं संप्रेरक असून ते शरीरातील रक्तातील साखरेचं नियमन करण्यासाठी जबाबदार ठरतं.

उच्च रक्तदाब

लठ्ठपणामुळे मुलांमध्ये उच्च रक्तदाबाचा धोका वाढू शकतो. जास्त वजन वाढल्याने हृदयावर तसेच रक्तवाहिन्यांवर जास्त दबाव पडतो ज्यामुळे उच्च रक्तदाबाची पातळी वाढते. उच्चरक्तदाब अनेकदा मुलांचे किंवा पालकांच्या लक्षात येत नाही कारण सुरुवातीला काही लक्षणं दिसून येत नाही.

सांध्यांच्या समस्या

लठ्ठपणा हे तुमच्या सांधे आणि हाडांसाठी आरोग्यावर विपरीत परिणाम करतं. ज्या मुलांचे वजन जास्त आहे ते अनेकदा गुडघे, सांधे आणि नितंबांमध्ये वेदना जाणवत असल्याची तक्रार करतात.

उच्च कोलेस्टेरॉल पातळी

अयोग्य आहाराच्या सवयी असलेली मुलं सतत साखरयुक्त पेयं, फ्रेंच फ्राईज, बर्गर, पिझ्झा, चिप्स, कँडीज, च्युइंगम्स, नूडल्स, पॅकेज फुड, मैद्याचा ब्रेड आणि बेक केलेले पदार्थ खातात. यामुळे उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या आढळून येते. कालांतराने यामुळे एथेरोस्क्लेरोसिस नावाची स्थिती उद्भवू शकते. ज्यामध्ये हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी आजारांचा धोका वाढवतो.

Child Obesity
Breast Cancer: घट्ट ब्रा घातल्यामुळे स्तनांचा कर्करोग होतो? डॉक्टरांनी दिलं खरं उत्तर पाहा!

मुलांमधील लठ्ठपणा कसा टाळू शकतात पालक

तुमच्या मुलांना दीर्घ कालावधीसाठी त्यांच्या इलेक्ट्रॉनिक स्क्रीनवर चिकटून राहण्याऐवजी मैदानी खेळावर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहित करा. सायकल चालवणं, धावणं, मित्रांसोबत शारीरिक खेळ खेळणं, जॉगिंग, ध्यान करणं, योगासनं, नृत्य, चालणं, एरोबिक्स आणि पोहणं यासारख्या कोणत्याही स्वरूपातील शारीरिक हालचालींमध्ये मुलांना किमान 45 ते 50 मिनिटे गुंतवलं पाहिजे.

मुलांना निरोगी आहाराची सवय लावणं त्याचप्रमाणे त्यांच्या आहाराच्या सवयी सुधारण्यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. चांगल्या आरोग्यासाठी शर्करायुक्त पेये, पॅकेज फुड आणि तळलेले पदार्थ टाळून निरोगी आहाराच्या सवयी लावणं गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com