
बदलत्या जगानुसार हल्ली Google pay, Phonepe, Paytm आणि पैसे ट्रान्सफर करण्यासाठी अनेक सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. बरेचदा पैसे ट्रान्सफर करताना आपण पिन विसरतो. त्यामुळे पैसे ट्रान्सफर करताना आपल्या नाकी नऊ येतात.
अशातच भारताचा युनिफाइड पेमेंट इंटरफेस(UPI)केवळ देशातच नाही तर इतर देशांमध्येही त्याचा प्रभाव पाडत आहे. त्याच्या लोकप्रियतेमुळे अनेक बदल होतानाही दिसत आहे. वापरकर्त्यांना त्याचा अधिक फायदा होण्यासाठी त्याच्यावर कामही सुरु आहे.
यात नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI)ने त्यात नवीन वैशिष्ट्ये जोडले आहे. ही सुविधा व्हॉइस मोड पेमेंटमध्ये असणार आहे. ही सुविधा यूपीआयद्वारे वापकर्त्यांना देण्यात आली आहे. याचा अर्थ असा की, आता मोबाईलवर (Mobile) बोटे फिरवण्याची गरज वापरकर्त्यांना भासणार नाही.
1. RBI गव्हर्नरने लॉन्च केली
UPI मध्ये बोलून पेमेंट करण्याची ही नवीन सेवा सुरु केल्याने पेमेंट प्रक्रिया अधिक जलद गतीने होणार आहे. NPCI Hello UPI ची ही नवीन सेवा भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये लॉन्च केली आहे. यामध्ये अॅप्स, फोन कॉल्स आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज (IOT) उपकरणांद्वारे हिंदी आणि इंग्रजीमध्ये व्हॉइस मोडद्वारे UPI पेमेंट (Payment) करता येते. याशिवाय, बुधवारी NPCI ने UPI मध्ये सादर केल्या आहेत.
2. 100 रुपयांची मर्यादा
डिजिटल पेमेंटमध्ये वापरकर्त्यांनी अधिक लाभ घेण्यासाठी NPCI च्या UPI ने हे नवीन फीचर लॉन्च केले आहे. Hello UPI फीचरद्वारे व्हॉइस मोडमध्ये पेमेंट करण्यासाठी सध्या १०० रुपयांची मर्यादा ठेवण्यात आली आहे. पैसे पाठवण्यासाठी कॉलद्वारे हॅलो UPI बोलून पैसे पाठवू शकता. NPCI नुसार पेमेट करण्यापूर्वी वापरकर्त्यांना क्रेडिट लाइन वापरुन बँकेची परवानगी घ्यावी लागेल.
यासाठी आपला मोबाईल हा बँकेशी कनेक्टेड हवा. तसेच UPI वर तुमच्या बँकेचे नावही असायला हवे. त्यानंतर ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहे त्याचे नाव आणि नंतर UPI पिनच्या मार्फत सहज पेमेंट करु शकता.
3. दोन भाषेत वापरण्याचा पर्याय
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने सध्या हिंदी आणि इंग्रजी भाषेत ही सुविधा सुरु केली आहे. तसेच लवकरच यामध्ये इतर भाषांचा समावेश होणार आहे. NPCI ने म्हटले आहे की, पेमेंटसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारेही (AI) पेमेंटचा विस्तार अधिक जलद होईल. ज्यामुळे डिजिटल पेमेंटला नवीन चालना मिळेल. तसेच UPI द्वारे पेमेंट केल्यास आपल्याला बिल पे कनेक्ट सुविधा मिळू शकते.
4. NPCI ने या सुविधा सादर केल्या
NPCI ने यासाठी अनेक सुविधा सादर केल्या आहेत. यामध्ये UPI वरील 'क्रेडिट लाइन' सेवेचाही समावेश आहे. या सुविधेद्वारे वापरकर्त्यांना बँकांकडून पूर्व-मंजूर बँक कर्ज घेण्याची सुविधा मिळेल. याद्वारे ग्राहक पूर्व-मंजूर कर्जाद्वारे UPI प्लॅटफॉर्मवर व्यवहारही करू शकतील. याशिवाय NPCI ने 'Lite X' नावाचे आणखी एक नवीन फीचर लाँच केले आहे, जे ऑफलाइन पेमेंटमध्ये वापरले जाऊ शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.