UPSC NDA 1 2023 Exam : आता 12 वी शिकणाऱ्यांसाठी NDA प्रवेश प्रक्रिया सुरु, असा कराला अर्ज

UPSC NDA प्रवेश परीक्षेद्वारे, कोणीही भारतीय सैन्यात (लष्कर, हवाई दल आणि नौदल) अधिकारी बनू शकतो.
UPSC NDA 1 2023 Exam
UPSC NDA 1 2023 Exam Saam Tv
Published On

UPSC NDA 1 2023 Exam : UPSC NDA प्रवेश परीक्षेद्वारे, कोणीही भारतीय सैन्यात (लष्कर, हवाई दल आणि नौदल) अधिकारी बनू शकतो. यूपीएससी एनडीए प्रवेश परीक्षेची अधिसूचना लवकरच प्रसिद्ध केली जाईल. जर तुमचे भारतीय सैन्यात भरती होण्याचे स्वप्न असेल तर तुम्ही ते पूर्ण करू शकता.

UPSC NDA प्रवेश परीक्षा (Exam) एप्रिल महिन्यात होणार आहे. UPSC NDA प्रवेश परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाते. UPSC NDA 1 २०२३ साठी अर्ज प्रक्रिया आता सुरू आहे. UPSC NDA 2 २०२३ साठी अर्ज प्रक्रिया मे मध्ये होईल. त्याची परीक्षा ऑगस्ट-सप्टेंबर २०२३ मध्ये होईल.

UPSC NDA 1 2023 Exam
MPSC Exam: एमपीएससी अभ्यासक्रम आणि परीक्षेची बदलेली पद्धत २०२५ पासून लागू करावी; पुण्यात विद्यार्थ्यांची जोरदार निदर्शनं

भारताच्या तिन्ही सैन्यात सामील होऊन, जर तुम्ही देशाची सेवा करण्याचे सुंदर स्वप्न आणि रोमांचक जीवन जगत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) लवकरच १२ व्या वर्गातील तरुणांसाठी राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमी प्रवेश परीक्षा (NDA/NA) साठी अधिसूचना जारी करेल.

UPSC च्या परीक्षा दिनदर्शिकेनुसार, NDA प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया २१ डिसेंबरपासून सुरू होईल. यासाठीचे अर्ज १० जानेवारी २०२३ पर्यंत सादर करता येतील. म्हणजे, जर तुम्ही एनडीए परीक्षेची तयारी करत असाल तर आता त्याबाबत गंभीर होण्याची वेळ आली आहे.

UPSC NDA 1 2023 Exam
MPSC Exam : तृतीयपंथीयांसाठी खुशखबर! पोलीस भरतीत स्वतंत्र्य पर्याय उपलब्ध होणार

तुम्ही UPSC वेबसाइट https://www.upsc.gov.in/ ला भेट देऊन NDA प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करू शकाल. एनडीए प्रवेश परीक्षा २०२३ अधिसूचना UPSC च्या या वेबसाइटवर देखील उपलब्ध असेल. महिला UPSC NDA प्रवेश परीक्षेसाठी देखील अर्ज करू शकतात.

UPSC NDA १ ,२०२३ आवश्यक पात्रता -

  • उमेदवार भारतीय, नेपाळी किंवा भूतानचे रहिवासी असले पाहिजेत.

  • भारताचे रहिवासी होण्याच्या उद्देशाने १ जानेवारी १९६२ पूर्वी भारतात आलेले तिबेटी निर्वासितही अर्ज करू शकतात.

  • उमेदवार १२वी किंवा १२वी उत्तीर्ण असावा.

  • उमेदवारांचे वय १६.५-१९.५ वर्षे दरम्यान असावे.

UPSC NDA १ , २०२३निवड प्रक्रिया -

नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी आणि नेव्हल अॅकॅडमीमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रथम UPSC द्वारे घेतलेली लेखी परीक्षा उत्तीर्ण करावी लागते. UPSC NDA प्रवेश परीक्षा 900 गुणांची असते. यूपीएससी एनडीए प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर, तुम्हाला एसएसबी मुलाखत फेरीला सामोरे जावे लागेल. लेखी परीक्षेप्रमाणेच मुलाखतही ९०० गुणांची असते. जर एसएसबी मुलाखत देखील क्रॅक असेल तर वैद्यकीय चाचणी केली जाईल आणि नंतर अंतिम निकाल घोषित केला जाईल.

UPSC NDA १, २०२३ परीक्षा कधी होणार?

UPSC च्या कॅलेंडरनुसार, UPSC NDA १ २०२३ ची परीक्षा १६ एप्रिल २०२३ रोजी होणार आहे. NDA/NA II २०२२ च्या परीक्षेबद्दल बोलायचे झाले तर ती ४ सप्टेंबर २०२२ रोजी घेण्यात आली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com