MPSC Exam : तृतीयपंथीयांसाठी खुशखबर! पोलीस भरतीत स्वतंत्र्य पर्याय उपलब्ध होणार

एमपीएससीमध्ये पोलीस भरतीत तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र्य पर्याय १३ डिसेंबरपर्यंत उपलब्ध होणार आहे.
police Recruitment
police Recruitment Saam tv
Published On

MPSC Exam News : तृतीयपंथीयांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. एमपीएससीमध्ये पोलीस भरतीत तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र्य पर्याय १३ डिसेंबरपर्यंत उपलब्ध होणार आहे. तसेच अडीच महिन्यांत तृतीयपंथीयांच्या शारिरीक चाचणीसाठी स्वतंत्र्य नियमावली बनवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. या निर्णयामुळे तृतीयपंथीयांना खाकी वर्दी घालण्याची संधी मिळणार आहे. (Latest Marathi News)

police Recruitment
Wardha News: तृतीयपंथी शिवानी वर्धा जिल्‍हा ‘आयकॉन’; मतदार नोंदणीसाठी करणार प्रोत्‍साहित

गृह विभागातील सरसकट सर्व नोकर भरतीत तूर्तास तृतीयपंथीयांना संधी नाहीच. परंतु तृतीयपंथीयांसाठी आता एमपीएससीमध्ये पोलीस (Police) भरतीत तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र्य पर्याय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आता अवघ्या अडीच महिन्यात तृतीयपंथीयांच्या शारिरीक चाचणीसाठी स्वतंत्र्य नियमावली बनवण्यात येऊ शकते.

तृतीयपंथीयांच्या शारीरिक चाचणी २८ फेब्रुवारीनंतर नव्या नियमावलीनुसार घेण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, परीक्षेसाठी १५ डिसेंबरपर्यंत MPSC अर्ज करण्याची मुदत वाढवली आहे. तसेच १३ डिसेंबरपर्यंत पोलीस भरतीत स्वतंत्र्य पर्याय उपलब्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता आशितोष कुंभकोणी यांनी दिली.

police Recruitment
Nashik Accident: नाशिकमध्ये अपघाताचे सत्र सुरूच, भीषण अपघातात 4 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू

दरम्यान, या निर्णयावर मॅटपासून ते उच्च न्यायालयापर्यंत लढाई लढणाऱ्या तृतीयपंथी आर्या पुजारी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 'मुंबईच्या उच्च न्यायालयाने तृतीयपंथीच्या हक्कासंदर्भात आज ऐतिहासिक निर्णय दिला आहे. महाराष्ट्र पोलीस दलात तृतीयपंथीयांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे'.

'MPSC मध्ये पोलिस भरतीच्या अर्जात स्त्री आणि पुरूष यांच्यासोबत तृतीयपंथी यांचा स्वतंत्र पर्याय ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. हा लढा इतका सोप्पा नव्हता, असे मत पुजारी यांनी व्यक्त केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com