How to Clean Yellow Teeth: कितीही घासले तरी दातांचा पिवळापणा तसाच राहातो ? या 5 टिप्स फॉलो करा

Home Remedies for Yellow Teeth : कधी कधी दातांवर पिवळेपणा येतो. किती महागडा ब्रशचा वापरला तरी आपल्या दातांचा पिवळेपणा काही नाहीसा होत नाही.
How To Remove Plaque From Teeth
How To Remove Plaque From TeethSaam Tv
Published On

Yellow Teeth Care : दातांचा पिवळेपणा व तोंडाच्या दुर्गंधीमुळे अनेकदा आपण त्रस्त होतो. आपण जे काही अन्नपदार्थ खातो ते एकतर दातात अडकतात किंवा त्याची छटा ते आपल्या दातांवर सोडतात. खरेतर आपले संपूर्ण आरोग्य हे दातांवर अवलंबून असते. ते जितके स्वच्छ व साफ असतील ते आजार आपल्यापासून लांब राहातील.

परंतु, कधी कधी दातांवर (Teeth) पिवळेपणा येतो. किती महागडा ब्रशचा वापरला तरी आपल्या दातांचा पिवळेपणा काही नाहीसा होत नाही. सुरुवातीच्या काळात आपल्याला कोणतीच समस्या जाणवतं नाही परंतु, जसं जसा हा पिवळेपणा वाढत जातो. त्यामुळे आपल्या इतरांसमोर जाण्याची लाज वाटते. यामुळे दात व हिरड्या देखील कमकुवत होतात ज्यामुळे आपण आजारी (Disease) पडायला लागतो. परंतु, आम्ही आज तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत ज्यामुळे दातांचा पिवळेपणा नाहीसा होईल.

How To Remove Plaque From Teeth
Baby Teething : तुमच्या बाळाचे दुधाचे दात येतायत? कशी घ्याल काळजी

1. कोणत्या लोकांना दातांच्या पिवळेपणाचा सामना करावा लागतो?

  • सतत गोड व स्टार्ट असणाऱ्या पदार्थ व पेयांचे सेवन करणे

  • एंटीडिप्रेसेंटसारख्या औषध (Medicine) खाणे, स्जोग्रेन्स सिंड्रोम सारख्या रोगामुळे कोरडे तोंड

  • डोके किंवा मान रेडिएशन असणाऱ्यांना

  • धुम्रपान करणाऱ्यांना

2. दातांवर पिवळेपणा येण्याची कारणे

क्लीव्हलँड क्लिनिकच्या मते, जेव्हा तुमच्या तोंडातील बॅक्टेरिया दूध, रस, कोल्ड ड्रिंक्स, ब्रेड, पास्ता आणि फळे यांसारख्या साखरयुक्त किंवा पिष्टमय पदार्थांमध्ये मिसळतात तेव्हा प्लेक तयार होतो. हे जीवाणू खाण्यापिण्यात कार्बोहायड्रेट्सचे विघटन करणारे ऍसिड सोडतात. तुम्ही खाल्ल्यानंतर किंवा प्यायल्यानंतर लगेच दात घासले नाहीत तर, बॅक्टेरिया, आम्ल आणि कार्बोहायड्रेट्सचे मिश्रण प्लेक तयार करू शकते.

How To Remove Plaque From Teeth
Child Teeth Care : मुलांच्या दातांसाठी 'हे' पदार्थ 'वाईट'च !

3. पिवळेपणा कसा कमी कराल ?

  • तुमच्या दातांमध्ये अडकलेल्या प्लेक आणि अन्नापासून मुक्त होण्यासाठी डेंटल फ्लॉस किंवा वॉटर फ्लॉसरने दिवसातून एकदा फ्लॉस करा.

  • मऊ-ब्रिस्टल टूथब्रश (मॅन्युअल किंवा पॉवर) आणि फ्लोराइड टूथपेस्टने दोन मिनिटे दात घासून घ्या. दिवसातून किमान दोनदा ब्रश करा.

  • जर तुम्ही खाल्ल्यानंतर किंवा पिल्यानंतर लगेच ब्रश करू शकत नसाल तर शुगरलेस गम चावा.

  • साखरयुक्त, पिष्टमय पदार्थ आणि पेये कमी करा. त्याऐवजी, साधे दही, कॉटेज चीज, कच्च्या भाज्या किंवा फळे खा.

  • वर्षातून किमान दोनदा दातांची तपासणी करून घ्या.

  • ओव्हर-द-काउंटर किंवा प्रिस्क्रिप्शन अँटीसेप्टिक माउथवॉशने स्वच्छ धुवा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com