Bad Friends: आयुष्यात 'अशा' पद्धतीचे मित्र कधीही बनवू नका; शत्रूपेक्षा कमी नसतात हे मित्र

Bad Friends: आयुष्यात प्रत्येकाला अशा एक मित्राची गरज असतेच. तुम्ही लोकांना ओळखणं शिकलं पाहिजे. जाणून घेऊया तुमच्या आयुष्यात कशा पद्धतीच्या लोकांशी फ्रेंडशिप करू नये.
bad friends
bad friendssaam tv
Published On

आपल्या आयुष्यात मित्र हे खूप महत्त्वाचे असतात. अडीअडचणीला किंवा एकमेकांच्या सुःख दुखामध्ये मित्र सहभागी होतात. या मित्रांकडे आपण आपल्या मनातील भावना शेअर करू शकतो. त्यामुळे आयुष्यात प्रत्येकाला अशा एक मित्राची गरज असतेच. मात्र काही मित्र असे असतात जे, मित्राच्या रूपात तुमचे शत्रू असतात.

अशावेळी तुम्ही लोकांना ओळखणं शिकलं पाहिजे. जाणून घेऊया तुमच्या आयुष्यात कशा पद्धतीच्या लोकांशी फ्रेंडशिप करू नये.

bad friends
Relationship Tips : तुमचा पार्टनर तुमच्याशी खोटं बोलतोय? 'या' सोप्या टीप्सने तुम्ही पकडू शकता खोट्या गोष्टी

अशा मित्रांपासून राहावं ४ हात लांब

स्वार्थी मित्र

काही लोकं स्वार्थी असून ते केवळ स्वतःचा विचार करतात. ज्यावेळी त्यांना तुमची गरज असते तेव्हा ते तुमच्याकडे येतात. मात्र त्यांना तुमच्या भावना आणि त्यांच्या समस्यांची पर्वा नसते. त्यांना फक्त तुमच्याकडून स्वतःच काम करून घ्यायचं असतं. अशा लोकांपासून दूर राहणं तुमच्या फायद्याचं असणार आहे.

ईर्ष्यावान व्यक्ती

तुम्ही हे पाहिलं पाहिजे की, कोणत्या लोकांना तुम्हाला होणाऱ्या आनंदावर जळतात. काही लोक इतरांच्या आनंदाचा आणि यशाचा हेवा करतात. हे लोक नेहमी तुमच्या यशाला कमी लेखण्याचा. अशावेळी या व्यक्ती तुमचा तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करतात. जर तुमचे मित्र तुमचा आनंद तुमच्यासोबत शेअर करू शकत नसतील तर त्यांच्यापासून दूर राहिलेलं तुमच्या फायद्याचं ठरेल.

खोट आणि अफवा पसरवणारे मित्र

आपल्या आयुष्यात खोटं बोलणाऱ्या व्यक्तींना कधीही स्थान देऊ नका. तुम्हाला जीवनात असे काही लोक दिसतील ज्यांना अफवा पसरवण्यात आनंद मिळतो. असे लोक नेहमी तुमच्यासमोर इतरांबद्दल वाईट बोलतात. या व्यक्ती कोणाच्याही वैयक्तिक गोष्टी शेअर करण्यास मागेपुढे पाहत नाही. त्यामुळे जर या व्यक्ती तुमच्या आजूबाजूला असतील तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करा.

सतत नकारात्मक विचार करणारे मित्र

तुमच्या आयुष्यात नेहमी सकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तींना तुमच्या आजूबाजूला ठेवावं. मात्र असे काही मित्र असतात जे नेहमी नकारात्मक विचार करत असतात. अशा नकारात्मक मित्रांच्या गोष्टीचा तुमच्या आयुष्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

bad friends
Relationship Tips: मुलगा आपल्या प्रेमात पडलाय हे कसं जाणून घ्याल, मुलींनी फॉलो कराव्या या टीप्स!

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com