Navratri Ashtami Pooja : नवरात्रीत अष्टमीला मुलींना द्या हे खास वाण; घरात धनसंपत्ती नांदेल

Ashtami Pooja in Navratri : तुम्ही दरवर्षी सारखं रुमाल, टिकल्या न देता काही वेगळ्या गोष्टींची निवड करु शकता. ज्या त्या मुलींसाठी उपयोगाच्या ठरतील. तसेच खर्चही जास्त होणार नाही.
Navratri Ashtami Pooja
Ashtami Pooja in Navratrigoogle
Published On

नवरात्री सणाला नुकतीच सुरुवात झाली आहे. स्त्रिया सध्या शॉपिंगमध्ये बिझी असल्याचे दिसत आहे. नवरात्र म्हंटल तर, नऊ दिवस महिलांना नऊ वेगवेगळे कपडे, चपला , कानातले, खाण्याचे पदार्थ, उपवासाचे पदार्थ ,पुजा, नैवेद्य आणि सवाष्णींसाठी वाण या गोष्टी पाहाव्या लागतात. ज्या महिला घट बसवतात त्यांना दरवर्षी हा प्रश्न पडत असतो. खण नारळ या गोष्टी तर आपण देतोच पण सोबत वाण म्हणून काही भेट वस्तुही देतो. ती वस्तू मुलींच्या वापरातली असायला हवी.

नवरात्रीत लहान कुमारीकांची पुजा केली जाते. त्यावेळेस आपण त्यांना वाण देतो. यंदाच्या वर्षी तुम्ही वाणात काही बदल करु शकता. तुम्ही दरवर्षी सारखं रुमाल, टिकल्या न देता काही वेगळ्या गोष्टींची निवड करु शकता. ज्या त्या मुलींसाठी उपयोगाच्या ठरतील. तसेच खर्चही जास्त होणार नाही. आपण नेहमीच काही तरी वेगळे द्यायचा विचार करत असता. मात्र या वेळी तुम्ही अश्या वाणाची निवड करा जे पाहून मुली (सवाष्णी) खुश होतील त्या वस्तु पुढील प्रमाणे असतील.

Navratri Ashtami Pooja
Navratri Trending Songs: एकदा वाजवून तर बघा ; नवरात्रीत ही धुमाकूळ घालणारी गाणी

१. काजळ

मुलींच्या वापरातील आणि मुलींचे आवडते मेकअप प्रोडक्ट म्हणजे काजळ. तुमच्या खिशाला परवडेल असे हे वाण आहे.

२. मॉईश्चरायजर

आता हिवाळा ऋतू येइल त्या वेळेस महिला मॉईश्चरायजरचा वापर आवर्जून करतात. त्यासाठी तुम्ही त्यांना ही स्कीन केअर ची महत्वाची गोष्ट देवू शकता.

३. बाटली

महिलांनी जास्त पाणी पिणं आवश्यक असते. त्या कामाच्या वेळेस खाणं-पिणं विसरुन जातात. त्यासाठी तुम्ही बाजारात्या नविन डिजाइनच्या बाटल्या त्यांना देवू शकता.

४. चहाचा कप

रोजच्या वापरातील गोष्ट म्हणजे चहा किंवा कॉफीसाठी कप. ही भेटवस्तू पाहून सगळ्याच महिला नक्कीच खूश होतील.

५ . पाऊच

मुली म्हंटले तर त्यांच्याकडे अनेक लहान वस्तु त्यांच्या रोजच्या वापरातल्या असतात. कामाच्या वेळेस त्या वस्तू कुठेही ठेवतात.मग त्या सापडत नाहीत. अश्या वेळेस पाऊच खुप फायदेशीर ठरु शकतो.

या वस्तू तुम्ही वाणात देवून कुमारीकांना खुश करु शकता. नेहमीच तुम्ही अश्या गोष्टींची निवड करा ज्या महिलांसाठी खुप उपयोगाच्या ठरतील. तसेच तुमच्या खिशाला परवडेल अश्या वस्तुंची तुम्ही निवड करू शकता.

Edited By : Sakshi Jadhav

Navratri Ashtami Pooja
Navratri Food : नवरात्रीत शेंगदाण्याचे सेवन करताय? असंख्य फायदासोबत नुकसानही तितकेच !

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com