ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपण आता डिजीटल युगात राहतो. त्यात आपण अनेक सोशल मीडियावरच्या ट्रेंडला फॉलो करत असतो.
या वर्षीच्या दसऱ्याला तुम्ही पुढची ट्रेंडिग गाणी लावून नवरात्रीचा माहोल तयार करु शकता.
गरबा हा गुजराती लोकांचा आवडता सण आहे. त्यासाठी तुम्ही "ढाकला सॉंग "लावू शकता.
बॉलिवुडचे "शुभारंभ सॉंग" तुम्ही गरबा खेळताना लावू शकता.
आयुष शर्मा आणि वारीना हुसैन यांचे गाजलेले "चोगाडा" हे गाणे तुम्ही वाजवू शकता.
आलिया भटचे गंगूबाई या चित्रपटातील गाणे लावून तु्म्ही उत्तम रित्या गरब्याचा ठेका धरु शकता.
भाविकांचा उत्साह वाढवण्यासाठी तुम्ही "गोलीयो की रासलीला "हे गाणे वाजवू शकता.
सुप्रसिद्ध गायक मिका सिंग याने गायलेले "सनेडो" हे गाणे दरवर्षीच्या गरब्यात असते. या गाण्याशिवाय गरबा अपुरा वाटतो.