Navratri 2023 Wishes In Marathi
Navratri 2023 Wishes In MarathiSaam TV

Navratri 2023 Wishes In Marathi| मराठीतून द्या नवरात्रोत्सवाच्या खास शुभेच्छा

Navratri 2023 Wishes: १५ ऑक्टोबर म्हणजे आज घटस्थापना करून नवरात्रोत्सवाला सुरूवात होईल. तर २३ ऑक्टोबर म्हणजेच सोमवारी नवरात्री समाप्त होईल.
Published on

Navratri 2023 :

अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाला (Navratri wishes in marathi) हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. शरद ऋतूपूर्वी हा नवरात्रोत्सव सुरू होतो. त्यामुळे त्याला शारदीय नवरात्री असे देखील म्हटले जाते. नवरात्रोत्सवामध्ये देवीच्या ९ रूपांची पूजा, आराधना, उपासना केली जाते. १५ ऑक्टोबर म्हणजे आज घटस्थापना करून नवरात्रोत्सवाला सुरूवात होईल. तर २३ ऑक्टोबर म्हणजेच सोमवारी नवरात्री समाप्त होईल.

Navratri 2023 Wishes In Marathi
Anushka Sharma-Arijit Singh: अनुष्कासाठी अरिजित बनला फोटोग्राफर! भारत-पाकिस्तान सामन्यातील मैदानातील VIDEO व्हायरल

नवरात्रोत्सवानिमित्त राज्यातील वेगवेगळ्या देवीच्या मंदिरामध्ये यात्रा भरते. नवरात्रोत्सवानिमित्त महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांसोबतच इतर देवींच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतात. नवरात्रोत्सवानिमित्त प्रत्येक जण आपल्या जवळच्या नातेवाई, मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबीयांना शुभेच्छा देतात. यावर्षी तु्म्ही देखील आपल्या प्रियजनांसोबत मित्र परिवार, नातेवाईकांना नवरात्रोत्सवाच्या मराठीमध्ये शुभेच्छा देत हा ९ दिवसांचा सण साजरा करू शकता...

1. या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता।

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

नवरात्रोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा!

2. आई जगदंबेची तुमच्यावर अखंड कृपा राहो,

तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि सुखी होवो,

देवी जगदंबेच्या चरणी हीच आमची प्रार्थना,

नवरात्रोत्सवाचा तुम्हाला आणि कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा!

Navratri 2023 Wishes In Marathi
Navratri 2023 Kalash Sthapana: शारदीय नवरात्रीत कलश स्थापना करताय? जाणून घ्या पूजा लिस्ट आणि मुहूर्त

3. शक्ती अंगी येते आई तुझे नाव घेता

चैतन्य अंगी येते तुझे रूप पाहता

संकटे सगळे मिटून जातात तुझे स्मरण होता

सर्वांना नवरात्रीच्या हार्दीक शुभेच्छा

4. होऊ दे सर्व दिशी मंगल,

चढवितो रात्र न् दिन संबाळ,

फुलवितो दिव टी दीप कळी,

आम्ही आंबेचे गोंधळी,

नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

Navratri 2023 Wishes In Marathi
Shardiya Navratri 2023 : नवरात्रौत्सवाला आजपासून प्रारंभ; अंबाबाई-तुळजापूरसह राज्यभरातील मंदिरे सजली, भाविकांची गर्दी

5. नारी तू नारायणी,

नारी तू सबला तुझ्या तेजाने उजडे सृष्टी,

नमितो आम्ही तुजला,

नवरात्रोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

6. सर्व मंगल मांगल्ये,

शिवे सर्वार्थ साधिके,

शरण्ये त्र्यंबके गौरी,

नारायणी नमोस्तुते,

तुम्हाला नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

Navratri 2023 Wishes In Marathi
Ghatasthapana 2023: नवरात्रीत कलश स्थापना कशी कराल? जाणून घ्या पूजा पद्धत

7. प्रथमं शैलपुत्रीति, द्वितीयं ब्रह्मचारिणी।

तृतीयं चन्द्रघण्टेति, कूष्मांडीति चतुर्थकम्।।

पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीतिच ।

सप्तमं कालरात्रिश्च महागौरीतिचाष्टमम् ।।

नवमं सिद्धिदां प्रोक्ता नवदुर्गाः प्रकीर्तिताः ।

उक्तान्येतानि नामानि ब्रह्मणैव महात्मना ।।

नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

8. न – नवीन चैतन्याची दाता

व – वरदान देती भक्ता

रा – रात्र दिवस भक्तांसाठी सज्ज असणारी माता

त्री – त्रिकाल रक्षण करती

अशा सर्व रूपात असणाऱ्या देवीला वंदन

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

Navratri 2023 Wishes In Marathi
Shardiya Navratri Travel Plan : दुर्गापूजा ते गरबा! भारतातील 'या' शहरात नवरात्रीचा जल्लोष, फिरण्याचा करा प्लान

9. देवी आदिशक्तीची कृपा तुमच्यावर सदा राहो।

अक्षय धन, सुख समृद्धी आणि ज्ञानाचा साठा होवो।।

शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

10. नव कल्पना

नव ज्योत्स्ना

नव शक्ती

नव आराधना

नवरात्रीच्या या पावन पर्वावर पूर्ण होवोत तुमच्या सार्‍या मनोकामना

नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

11. या नवरात्रीत शक्तीची देवी माता दुर्गा

सर्वांना सुख समृद्धी व यश प्राप्तीचा आशीर्वाद देवो

हीच आंबे मातेच्या चरणी प्रार्थना

नवरात्रोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

Navratri 2023 Wishes In Marathi
Navratri Garaba Night : नवरात्रीला लेहेंगा-चोलीचं का परिधान करतात? जाणून घ्या कारण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com