Narali Purnima 2024 : सण आयलाय गो, नारळी पुनवेचा! समुद्राचं आणि नारळी पौर्णिमेचं कनेक्शन काय? जाणून घ्या महत्त्व

Narali Purnima Importance : सण आयलाय गो, नारळी पुनवेचा! श्रावण महिन्यातील नारळी पौर्णिमा सणाला खूप मोठे महत्त्व आहे. या दिवशी कोळी बांधव समुद्राची पूजा करून नारळ अर्पण करतात. चला तर मग समुद्राचं आणि नारळी पौर्णिमेचं कनेक्शन जाणून घेऊयात.
Narali Purnima Importance
Narali Purnima 2024SAAM TV
Published On

श्रावण महिना येताच सणांना सुरुवात होते. सर्वत्र आनंदाच वातावरण पाहायला मिळते. यंदा नारळी पौर्णिमा १९ ऑगस्ट २०२४ रोजी आली आहे. नारळी पौर्णिमा हा सण महाराष्ट्र आणि लगतच्या कोकणी प्रदेशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

श्रावण महिन्यातील पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असे म्हणतात. कोळी बांधवांचा हाव मोठा सण आहे. तसेच या दिवशी रक्षाबंधनही साजरा केला जातो. भावा बहिणीच्या अतूट प्रेमाचा हा सण आहे. नारळी पौर्णिमेला कोळी बांधव समुद्राची मनोभावे करतात आणि आपल्या भावना व्यक्त करतात. नारळी पौर्णिमेला समुद्रात नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे. याचे महत्त्व जाणून घेऊयात.

कृतज्ञता

नारळी पौर्णिमा हा सण कृतज्ञतेचे प्रतीक आहे. या दिवशी निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. कारण पावसाळा वगळता बाकी सर्व महिने कोळी बांधव समुद्रावर असतात. हा अथांग समुद्र कोळीबांधवांचे संरक्षण करतो. तसेच या समुद्रामुळेच कोळी लोकांचे पोट भरले जाते. कोळी बांधवांसाठी समुद्र हा अन्नदाता असल्यामुळे ते लोक समुद्राची पूजा करतात. रोजचा समुद्र प्रवास सुरक्षित व्हावा, काही अडथळे येऊ नये, जहाजे-नौका पाण्यात बुडू नये यासाठी कोळी बांधव समुद्रात नारळ सोडतात आणि समुद्राला शांत करतात.

धनधान्याची समृद्धी

कोळी बांधव नारळी पौर्णिमेला सोन्याचे वेष्टन लावून नारळ पाण्यात सोडतात. यालाच सोन्याचा नारळ म्हणतात. हा नारळ छान सजवून आणि समुद्राला अर्पण केला जातो. भारतीय संस्कृतीत नारळ सर्जनशक्तीचे प्रतीक मानले जाते. या दिवशी नारळाच्या खोबऱ्याच्या करंज्या देखील बनवल्या जातात. तसेच त्यांचा नैवेद्य समुद्राला अर्पण केला जातो. कोळी महिला हा नैवेद्य समुद्राला दाखवून आपल्या नवऱ्याच्या संरक्षणाची प्रार्थना करतात.

Narali Purnima Importance
Raksha Bandhan 2024 : यंदा 'रक्षाबंधन' ला घरीच बनवा १० मिनिटांत राखी, लाडका भाऊ होईल खुश अन् पाडेल गिफ्ट्सचा पाऊस

कोळी वाडा

कोळी वाड्यात नारळी पौर्णिमेचा मोठा उत्साह साजरा केला जातो. या दिवशी कोळी महिला नटून थटून साज श्रृंगार करतात. तसेच कोळी पुरुष देखील पारंपरिक पोषाख परिधान करतात. या दिवशी बोटी आणि होड्या सजवल्या जातात. त्यांना मस्त रंग मारला जातो. कोळी वाड्यात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. कोळी गाण्यांवर कोळी बांधव ठेका धरून नाचू लागतात. या दिवशी घराघरांत नारळाचा गोड पदार्थ बनवले जातात. उदा. नारळाचा भात, नारळाची वडी

Narali Purnima Importance
Independence Day Special Recipe : स्वातंत्र्य दिन साजरा करताना घरच्याघरी बनवा तिरंगा पुलाव; वाचा सिंपल आणि झटपट तयार होणारी रेसिपी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com