Mukhyamantri Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे सादर करावा? वाचा सविस्तर

Majhi Ladki Bahin Yojana Application and Documents: योजनेचा लाभ नेमका कसा मिळवावा? त्यासाठी काय करावे? अर्ज कुठे करावा? असे अनेक प्रश्न महिलांच्या मनात आहेत. त्याचीच माहिती या बातमीतून जाणून घेणार आहोत.
Mukhyamantri Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे सादर करावा? वाचा सविस्तर
Mukhyamantri Ladki Bahin YojanaSaam TV
Published On

अमर घटारे

महिलांसाठी राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेमुळे महिला वर्गाने आनंद व्यक्त केलाय. लाडकी बहीण योजनेअंतर्गत गरीब आणि गरजू महिलांना दरमहा १५०० रुपये देण्यात येणार आहेत. आता या योजनेचा लाभ नेमका कसा मिळवावा? त्यासाठी काय करावे? अर्ज कुठे भरावा? असे अनेक प्रश्न महिलांच्या मनात आहेत. त्याचीच माहिती या बातमीतून जाणून घेणार आहोत.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे सादर करावा? वाचा सविस्तर
Mukhyamantri Annpurna Yojana: काय आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना? कोणाला, किती सिलिंडर मिळणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती

योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, मुळ निवासी प्रमाणपत्र, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, बँकेचं पासबूक, मोबाईल क्रमांक ही कागदपत्रे योजनेसाठी पात्र महिलेकडे असायला हवीत.

कागदपत्रे येथे सबमीट करा

मुख्यमंत्री माझी लाडकीबहीण योजनेसाठी महिलांनी आपली आवश्यक संपूर्ण कागदपत्र गोळा झाल्यानंतर, गावातील अंगणवाडी सेविका, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक आणि सेतू केंद्रामध्ये जाऊन आपले कागदपत्र ऑफलाइन पद्धतीने तिथे सबमीट करावे.

नारी शक्ती ऍप

त्यांनतर येथील कर्मचारी ते कागदपत्र शासनाच्या नारी शक्ती या ऍप्सवर अपलोड करतील. तसेच तो फ्रॉम सबमिट करतील. यासाठी कोणताही शुल्क लाभार्थ्यांना दयावा लागणार नाही.

नारी शक्ती हे शासनाचे ऍप्स लवकरच प्लेस्टोअर्सवर अपलोड केले जाणार आहे. कागदपत्र अपलोड केल्यावर त्या कर्मचाऱ्यांकडून लाभार्थी महिलांना पोच पावती दिली जाईल.

उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही

पुढे सेतू केंद्रावर उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी जी महिलांची गर्दी होत आहे ती सुद्धा कमी होईल. कारण आता उत्पनाचा दाखल्या येवजी केशरी किंवा पिवळे रेंशन कार्ड उत्पनाचा दाखला म्हणून गृहीत धरले जाणार आहे.

यासोबत अधिवास प्रमाणपत्राची अट शिथिल करून जन्माचा दाखला, निवडणूक कार्ड गृहीत धरले जाणार आहे, याबाद संपूर्ण माहिती अमरावती जिल्हापरिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके यांनी दिली आहे.

नाव नोंदणीसाठी मुदतवाढ

योजनेसाठी नाव नोंदणी अर्ज करणे आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत मुदत वाढविण्याचे निर्देश दिले आहेत.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे सादर करावा? वाचा सविस्तर
mukhyamantri majhi ladki bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महिलांची राज्य सरकारकडे मोठी मागणी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com