Mothers Day 2024: मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी का साजरा करतात मातृदिन? जाणून घ्या कारण

Why Mothers Day Celebrated: प्रत्येक मुलासाठी आई ही अत्यंत जवळची व्यक्ती असते. आईच्या सन्मानासाठी, तिचा आदर करण्यासाठी मे महिन्याचा दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केला जातो.यावर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी म्हणजेच १२ मे रोजी 'मदर्स डे' साजरा केला जाणार आहे.
Mothers Day 2024
Mothers Day 2024Saam Tv

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी हे वाक्य प्रत्येकाला माहित आहे. प्रत्येकासाठी आईशिवाय मोठ या जगात कोणीच नाही. प्रत्येक मुलासाठी आई ही अत्यंत जवळची व्यक्ती असते. आईच्या सन्मानासाठी, तिचा आदर करण्यासाठी मे महिन्याचा दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केला जातो. यावर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी म्हणजेच १२ मे रोजी 'मदर्स डे' साजरा केला जाणार आहे.

प्रत्येक आई आपल्या मुलाला खूप प्रेमाने सांभाळते, मोठे करते. प्रत्येक सुख दुःखाच्या प्रसंगात ती आपली साथ देते. याच आईसाठी एक दिवस साजरा करायला हवा. तिचा सन्मान करायला हवा. तिच्यासाठी काहीतरी वेगळ करायला हवं. याच संकल्पनेतून हा दिवस साजरा केला जातो.

मदर्स डे कधीपासून साजरा केला जातो?

मदर्स डे साजरा करण्यामागे अनेक गोष्टी असल्याचे म्हटले जाते. त्यातील एक म्हणजे अॅना जार्व्हिसचा गोष्ट. अॅना जॉर्व्हिस या महिलेने सर्वप्रथम मदर्स डे साजरा करण्यास सुरुवात केली. अॅनाचे आपल्या आईवर प्रचंड प्रेम होते. परंतु अचानक तिच्या आईचे निधन झाले. अॅना अविवाहित होती त्यामुळेच तिच्यासाठी आई अतिशय जवळची व्यक्ती होती. आईच्या निधनानंतर तिचा सन्मान करण्यासाठी तिने मदर्स डे सेलिब्रेट करण्यास सुरुवात केली.

Mothers Day 2024
Body Odour Remedies: उन्हाळ्यात तुम्हालाही घामाचा उग्र वास येतोय? या घरगुती टीप्स करा ट्राय

१९०८ मध्ये पहिला 'मदर्स डे' अमेरिकेत साजरा करण्यात आला. अॅनाने आईसाठी ग्राफ्टन, वेस्ट वर्जिना येथे सर्वप्रथम मातृदिन साजरा केला. यानंतर अॅना आणि तिच्या मित्रांनी या दिवसाला राष्ट्रीय सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली. १९११ पर्यंत ही माहिती संपूर्ण देशभरात पसरली. या मागणीनंतर अमेरिकेत १९१४ मध्ये मे महिन्याचा दुसरा रविवार मातृदिन म्हणून साजरा करण्यास मंजुरी दिली. त्यानंतर जवळपास ५० हून अधिक देशात मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन साजरा केला जातो.

Mothers Day 2024
Antibiotics Awareness : गरज नसताना औषध घेतल्याने ओढावेल मृत्यू; डॉक्टरांनी दिलेली माहिती वाचा सविस्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com