पोटाचे टायर्स कमीच होत नाही? दुपारच्या आधी करा फक्त ३ गोष्टी, वजन घटणारच

Effective Weight Loss Tips: वजन कमी करण्यासाठी काही टिप्स फॉलो करा. सकाळी लवकर उठून ३ गोष्टी करा. वेट लॉससाठी होईल मदत.
Effective Weight Loss Tips
Effective Weight Loss TipsSaam
Published On

आजकाल वजन वाढणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. लाईफस्टाइल बिघडल्यामुळे वजनात देखील बदल होते. वजन वाढल्याने इतर आजार शरीरात घर करतात. त्यामुळे वजन कमी करणं गरजेचं आहे. वेट लॉससाठी लोक जिममध्ये व्यायाम करतात. प्रॉपर डाएट फॉलो करतात. वेट लॉसच्या निगडीत बऱ्याच गोष्टी करून पाहतात. पण काही चुकांमुळे वेट लॉस लवकर होत नाही.

वजन कमी करण्यासाठी काही निरोगी सकाळच्या सवयी अंगीकारणे देखील आवश्यक आहेत. दुपारच्या आधी आपण काही गोष्टी फॉलो करून निश्चितच वेट लॉस करू शकता. वेट लॉसचा प्रवास सोपा नाही, पण नियमित रूटीन फॉलो केल्यास नक्कीच वेट लॉस होईल.

Effective Weight Loss Tips
'आई-बाबा, मला माफ करा..'; NEETच्या विद्यार्थ्यानं उचललं टोकाचं पाऊल, सुसाईड नोटमध्ये लिहिलं कारण

सकाळी लवकर उठा

सकाळी लवकर उठल्यानं आपल्या चयापचय प्रक्रियेला गती मिळते. अधिक कॅलरिज बर्न होण्यास मदत होते. लवकरत उठल्यानंतर आपण योगा किंवा व्यायाम करू शकता. यामुळे आपल्याला वेट लॉससाठी मदत होईल.

Effective Weight Loss Tips
DNAचे जनक शास्त्रज्ञ जेम्स वॉटसन यांचं निधन; ९७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

नाश्ता स्किप करू नका

नाश्ता केल्याने दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते. नाश्त्यात आपण फळे, दही, ओट्स किंवा इतर हेल्दी पदार्थ खाऊ शकता. तसेच घरी तयार केलेले पदार्थ खा.

भरपूर पाणी प्या

दिवसभरात भरपूर पाणी प्या. पाणी प्यायल्याने चयापचय गती वाढते. सकाळी उठल्यावर एक ग्लास पाणी प्या. दिवसभरात किमान ८-१० ग्लास पाणी प्या.

वेट लॉससाठी काही इतर टिप्स

  • हळूहळू नीट चावून खा.

  • जेवताना फोन किंवा टिव्ही पाहू नका.

  • रात्री झोपण्यापूर्वी २ ते ३ तास आधी जेवण करा.

  • जेवल्यानंतर शतपावली करा.

  • स्ट्रेस फ्री राहण्याचा प्रयत्न करा.

  • दररोज ७ ते ८ तास झोपा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com