Mokshada Ekadashi 2023
Mokshada Ekadashi 2023Saam Tv

Mokshada Ekadashi 2023 : वर्षातील शेवटची एकादशी कधी? या वस्तू घरात आणल्याने नांदेल सुख-समृद्धी

Ekadashi 2023 : एकादशीचा शास्त्रात अतिशय शुभ मानला गेला आहे. हा मार्गशीर्ष महिन्याच्या अकराव्या दिवशी साजरा केला जातो. वर्षातील शेवटची एकादशी असल्याने तिला विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा करण्याची परंपरा आहे.
Published on

Mokshada Ekadashi :

एकादशीचा शास्त्रात अतिशय शुभ मानला गेला आहे. हा मार्गशीर्ष महिन्याच्या अकराव्या दिवशी साजरा केला जातो. ही एकादशी ही 22 डिसेंबर रोजी साजरी करण्यात येणार आहे. वर्षातील शेवटची एकादशी असल्याने तिला विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी चांगल्या भावनेने पूजा (Pooja) केल्याने मोक्ष प्राप्त होतो, असे मानले जाते.

मोक्षदा एकादशीचे धार्मिक फायदे

मोक्षदा एकादशीचे व्रत केल्याने पापांचा नाश होतो आणि व्रत करणाऱ्या व्यक्तीलाच नव्हे तर त्याच्या पितरांनाही मोक्ष प्राप्त होतो, अशी श्रद्धा आहे. या एकादशीचे महत्त्व अधिकच वाढते कारण या दिवशी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश केला होता. अशा वेळी गीता पठण केलेच पाहिजे. असे केल्याने अनेक पितृदोषांपासून मुक्ती मिळते.

मोक्षदा एकादशीला या वस्तू घरी आणा

ज्योतिषशास्त्रानुसार मोक्षदा एकादशीच्या दिवशी काही उपाय केल्यास अनेक समस्यांपासून मुक्ती मिळते. दुसरीकडे, जर तुम्ही या दिवशी तुमच्या घरात (Home) काही खास वस्तू आणल्या तर तुमच्या घरात सदैव समृद्धी राहील.

धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी पांढरा हत्ती, कामधेनू गाय आणि मासे यांची मूर्ती घरी आणावी. असे म्हणतात की जे लोक असे करतात त्यांच्या आयुष्यात सकारात्मक राहतात. तसेच घरात लक्ष्मीचा वास असतो. अशा स्थितीत या दिवशी या वस्तू आणाव्यात.

या मंत्रांनी भगवान विष्णूची पूजा करा

मङ्गलम् भगवान विष्णुः, मङ्गलम् गरुणध्वजः।

मङ्गलम् पुण्डरी काक्षः, मङ्गलाय तनो हरिः॥

ॐ ह्रीं कार्तविर्यार्जुनो नाम राजा बाहु सहस्त्रवान।

यस्य स्मरेण मात्रेण ह्रतं नष्‍टं च लभ्यते।।

शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्ण शुभाङ्गम्।

लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्॥

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com