Parenting Tips: मुलांच्या चांगल्या संगोपनासाठी फॅालो करा 'या' मॅार्डन पॅरेटिंग टिप्स

Modern Parenting Tips: जगातील सर्वच पालकांना आपल्या मुलांच्या उज्जवल भविष्याची काळजी असते. पालक आपल्या मुलांना चांगले संगोपन देण्याचा प्रयत्न करतात. परंतु कधीकधी पालकांच्या हाती काही चुका होतात. ज्याचा परिणाम मुलांवर होतो.
Parenting Tips
Parenting Tipsyandex
Published On

सर्वच पालक आपल्या मुलांना चांगले संगोपन देण्याचा प्रयत्न करतात. ज्यासाठी ते आपल्या मुलांना चांगल्या शाळांमध्ये प्रवेश मिळवून देतात. त्यांना सर्व सुख-सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत असतात.आपल्या मुलांना कोणतीही गोष्टीची कमतरता भासू नये याची ती काळजी घेत असतात. पण आजकाल मुलांना यशस्वी करण्यासाठी ज्या पालकत्वाचा अवलंब केला जातो त्या पद्धती पूर्णपणे बदलल्या आहेत. तुमच्या मुलांना भविष्यात यशस्वी करण्यासाठी आणि त्यांना चांगल्या सवयी शिकवण्यासाठी तुम्हाला मॅार्डन पालकत्वाचा अवलंब केला पाहिजे. यासाठी आम्हा तुम्हाला काही मॅार्डन पालकत्वासाठी टिप्स सांगणार आहोत.

चांगल्या कामाची स्तुती करा

मुलांच्या चुकांबद्दल नेहमी ओरडण्याऐवजी, त्यांच्या चांगल्या कामाबद्दल प्रशंसा करा. असे केल्यास मुलांचा आत्मविश्वास वाढेल. जे त्याला भविष्यात यशस्वी व्यक्ती बनण्यासाठी खूप मदत करेल. ज्या मुलांना आत्मविश्वासाची कमतरता असते त्यांना शाळेत चांगले काम करण्यात किंवा इतरांसमोर उघडपणे बोलण्यात कधीकधी अडचण येते. अशी मुले कोणतेही नवीन काम करताना नेहमी घाबरतात किंवा त्यांना छोट्या अपयशाची भीती वाटते. म्हणून मुलांमध्ये आत्मविश्वास वाढवण्याचा नेहमी प्रयत्न करा.

शिस्त लावा

मुलाने चूक केल्यावर एका पालकाने त्याला फटकारले आणि दुसऱ्याने त्याचे संरक्षण केले तर मूल सुधारण्याऐवजी त्या पालकाला आपला विरोधक किंवा शत्रू मानू लागतो. आणि जेव्हा तो मोठा होतो तेव्हा तो त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. मुलाला शिस्त लावण्यासाठी घरात एक नियम बनवा की जेव्हा एक व्यक्ती मुलाला ओरडत असेल तेव्हा दुसरी व्यक्ती मुलाचा बचाव करणार नाही. यामुले मुलांना त्याची चुकी समजेल.

तुलना करू नका

आपल्या मुलांना यशस्वी करण्याच्या इच्छेने पालक अनेकदा दुसऱ्या मुलांसोबत आपल्या मुलांचा तुलना करतात. पालकांनी आपल्या मुलांचा अभ्यास, खेळ, वागणूक इत्यादींबाबत कधीही इतर मुलांशी तुलना करू नये. असे करून तुम्ही तुमच्या मुलाचा आत्मविश्वास कमकुवत करत आहात. तुमच्या मुलाला त्याच्या आवडीनुसार कोणतेही काम करण्याची मुभा द्या.

जबाबदारी घ्या

मुलांना वाढवण्याची जबाबदारी दोन्ही पालकांची असते. म्हणून एका पालकावर संपूर्ण जबाबदारी टाकू नका. मुलाचे संगोपन करताना, पती-पत्नीने त्यांचे काम आपापसात विभागले पाहिजेत.आईने खाण्या-पिण्याशी संबंधित बाबींमध्ये बोलले पाहिजे आणि वडिलांनी अभ्यासाशी संबंधित गोष्टींची जबाबदारी घेतली पाहिजे. उत्कृष्ट पालकत्व कौशल्ये विकसित करण्याचा हा एक सोपा मार्ग आहे.

Parenting Tips
Skin Care Tips: वयाच्या चाळीशीनंतरही त्वचा टवटवीत आणि चमकदार हवी? मग फॅालो करा 'या' टिप्स

मुलांना वेळ द्या

सध्या पालकांसमोर मुलांना वेळ देणे हे मोठे आव्हान आहे. पालक आपल्या कामात खूप व्यस्त असल्यामुळे मुलांना पूर्ण वेळ देऊ शकत नाहीत. पण, मुलांना त्यांच्या पालकांच्या सहवासाची गरज असते. पालकांच्या पाठिंब्यामुळे मुलाचा मानसिक विकास होण्यास मदत होतो आणि त्याचे पालकांशी असलेले नाते घट्ट होते.

नियम बनवा

शिस्तीमुळे मुलांमध्ये नियंत्रणाची भावना विकसित होते. यासाठी पालकांनी मुलांसाठी घराचे काही नियम ठरवावे लागतील. उदाहरणार्थ, अभ्यास पूर्ण होईपर्यंत टीव्ही चालू होणार नाही. अशे नियम मुलांना शिस्त लावण्यास तुम्हाला मदत करू शकतात.

मुलांचा आत्मविश्वास वाढवा

ज्या मुलांमध्ये आत्मविश्वास कमी असतो त्यांना शाळा-कॉलेजमध्ये चांगले काम करण्यात किंवा इतरांसमोर उघडपणे बोलण्यात कधीकधी अडचणी येते. अशी मुले छोट्या-छोट्या अपयशाने घाबरतात. अशा परिस्थितीत मुलांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी, त्याला छोट्या छोट्या गोष्टींबद्दल किंवा काहीतरी नवीन आणि आव्हानात्मक करण्यासाठी प्रेरित करा. मुलांना जिंकणे किंवा हरणे याऐवजी कोणत्याही स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करा.

Edited by: Priyanka Mundinkeri

Parenting Tips
New Year Celebration: खास मैत्रीणींसोबत न्यू इयर सेलिब्रेशनचा प्लान करताय? मग भारतातील 'ही' बजेटफ्रेंडली डेस्टीनेशन ठरतील बेस्ट

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com