Smart Phone Repair: स्मार्टफोन खराब झाल्यास कमी खर्चात करा दुरुस्त, सरकारची ही वेबसाईट ठरेल फायदेशीर

Government Website: साधारणपणे मार्केटमध्ये आपल्याला दहा हजार रुपयांमध्ये उत्तम फीचर्स असलेला स्मार्टफोन सहज उपलब्ध होतो.
Repair Mobile Phone
Repair Mobile PhoneSaam Digital
Published On

Mobile Phone Repair Government Website

अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या जशा मुलभूत गरजा आहेत त्यामध्ये मोबाईलही प्रत्येक व्यक्तीची गरज बनली आहे. सध्या आपणही कॉल करणे, संदेश पाठवणे या मनोरंजनाच्या गोष्टीपासून ते महत्वाचे डोक्युमेंट स्वत:जवळ बाळगण्यासाठी मोबाईलचा वापर केला जातो.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Repair Mobile Phone
Healthy Lifestyle: 'या' सिंपल टिप्सने आयुष्यभर शरीर राहील तरुण आणि तंदुरुस्त

अर्थात दररोजच्या वापरातील कामापासुन ते ऑफिसच्या महत्वाच्या कामापर्यंत मोबाईला महत्वाचा वाटा आहे,त्यामुळे प्रत्येक व्यक्ती स्मार्ट फोन विकत घेणे महत्वाचे समजतो. कधीकधी तर आपण त्यासाठी अधिक पैसे खर्च करण्यासही तयार असतो.

साधारणपणे मार्केटमध्ये आपल्याला दहा हजार रुपयांमध्ये उत्तम फीचर्स असलेला स्मार्टफोन सहज उपलब्ध होतो मात्र प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आवडीनुसार स्मार्टफोन घेयचा असल्यास साधारण ३५ ते ६० हजार आरामात खर्च होऊन जातो. परंतू जर महागातले स्मार्ट फोन आपण घेतला आणि जर मोबाईला जरासे काही झाले तर त्याच्या खर्चही जास्त होतो.

तुमचाही फोन सतत पडतो का?

अनेकवेळा आपल्या हातातून किंवा काही काम करताना हातात असलेला फोन जमिनीवर पडतो. काहीवेळेस मोबाईला स्क्रॅच येत तर कधी मोबाईलची स्क्रीन फूटते मग मोबाईल नीट करण्यासाठीचा खर्च जास्त असतो. काही वेळेस मोबाईल दुरुस्तीसाठी देण्यात येतो तेव्हा त्याच अनेक प्रकारते दोषही निर्माण होतात. अशा स्थितीत, आपला मोबाईल दुरुस्त ही होत नाही. काहीवेळेस मोबाईलची मोबाईलची स्क्रीन दुरुस्त करण्यासाठी ५ ते १० हजार रुपये खर्च सर्रास होतो.

सरकारी वेबसाइटवरून स्वस्तात करा

साधारण आपल्यापैकी अनेकजण मोबाईल दुरुस्त करण्यासाठी मोबाईल कंपनीला देतो किंवा दुरूस्तीसाठी दुकानात देतो. त्यावेळी मोबाईल दुरूस्तीचा खर्च पाच ते दहा हजार पर्यंत येतो.मात्र तुम्हाला माहिती आहे का? सरकारी वेबसाईटवरुनही तुम्हाला तुमचा मोबाईल कमी खर्चाच दुरुस्त करुन मिळेल

सरकारच्या https://righttorepairindia.gov.in/ या वेबसाइटला भेट देऊन तुम्ही तुमचा फोन स्वस्तात दुरुस्त करून घेऊ शकता. हे एक स्वस्त फोन दुरुस्ती पोर्टल आहे. यासाठी सुरुवातीस फक्त या पोर्टलवर साइन करावे लागते त्यानंतर तेथे तुमच्या मोबाईल कंपनी आणि मोबाईस मॉडेल नोदंवावे लागते. त्यानंतर मोबाईलची स्क्रीन दुरूस्त करण्यासाठी किती खर्च येतो ते आपण पाहू शकतो.अशाप्रकारे मार्केटमधील किंमत आणि सरकारी वेबसाइटवर स्क्रीन दुरुस्तीचा खर्च पाहून तुमचा फोन सर्वात कमी किंमतीत कुठे दुरुस्त करता येईल हे तुम्ही ठरवू शकाल.

Repair Mobile Phone
Healthy Lifestyle: रात्री उशीरा जेवल्याने आरोग्य सुधारतं की बिघडतं? जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com