Car Mileage Tips : या छोट्या टिप्स वापरुन तुमच्या कारचं मायलेज वाढेल याशिवाय खर्चाची बचत होईल, आजच फॉलो करा

Car Care Tips : सध्या पेट्रोल डिझेलचे दर पूर्वीपेक्षा झपाट्याने वाढत आहेत.
Car Mileage Tips
Car Mileage TipsSaam Tv
Published On

Mileage Tips : सध्या पेट्रोल डिझेलचे दर पूर्वीपेक्षा झपाट्याने वाढत आहेत. मात्र, आतापर्यंत काही महिन्यांपासून दरात कोणताही बदल झालेला नाही. पण त्याचा खर्च सहन केल्याने तुमच्या बजेटवरही परिणाम होतो.आजकाल लोक रोज गाडीतूनच अप-डाऊन करत असतात, अशा परिस्थितीत तुम्ही छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेऊन तुमच्या कारमधील पेट्रोल वाचवू शकता. त्याच वेळी, तुमच्या कारचे मायलेज देखील चांगले असू शकते, या टिप्सबद्दल पाहूयात.

सुरळीत चालवा

जर तुम्हाला तुमच्या कारने चांगला मायलेज (Mileage) द्यायचा असेल तर स्मार्ट ड्रायव्हिंग करा. तुम्ही जर वारंवार ब्रेक लावलात तर त्याचा तुमच्या कारच्या मायलेजवर परिणाम होतो. कार त्याच वेगाने चालवण्याचा प्रयत्न करा आणि आवश्यक असेल तिथेच ब्रेक लावा.

Car Mileage Tips
Car Wash Tips : पावसात कार भिजलीये; नेमकी कशी घ्याल काळजी?

कार सर्व्हिसिंग

कोणतीही गोष्ट दीर्घकाळ चालवण्यासाठी सर्व्हिसिंगची गरज असते, त्यामुळे गाडीची वेळेवर सर्व्हिसिंग करून घ्या, यामुळे तुमच्या कारचे (Car) मायलेजही चांगले राहील आणि तुमच्या कारमध्ये जी काही समस्या असेल, ती मेकॅनिकला पाहून लगेच दूर केली जाईल.

टायरचा दाब तपासत राहा

घरातून बाहेर पडण्यापूर्वी एकदा टायरचे प्रेशर तपासा. कारच्या टायरचा दाब कमी असेल तर त्याचा मायलेजवर परिणाम होतो.त्यामुळे तुमची कार कमी मायलेज देते .

Car Mileage Tips
Tips to Drive Manual Cars : मॅन्युअल कार चालवताना चुकूनही या 5 चुका करू नका, अन्यथा...

कारमध्ये ओव्हरलोडिंग टाळा

गाडीच्या आत कधीही ओव्हरलोडिंग करू नये. तुमच्या गाडीत जागा आहे तितक्या लोकांना बसवा. कारमध्ये ओव्हरलोडिंग केल्यास त्याचा परिणाम इंजिनवर (Engine) होतो. जेव्हा इंजिनवर परिणाम होतो तेव्हा कारचे मायलेज आपोआप कमी होते.या टिप्स वापरल्यास तुमच्या कारचे मायलेज सहज वाढू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com