Car Wash Tips : पावसात कार भिजलीये; नेमकी कशी घ्याल काळजी?

Car Wash : पावसाळ्यात तुमची कार नियमित साफ आणि स्वच्छ करा.
Car Wash Tips
Car Wash TipsSaam Tv
Published On

Car Care : सध्या मुसळधार पावसाने जनजीवनावर परिणाम झाला आहे. पावसामुळे लोकांना खूप त्रास होत आहे. कधी ट्राफिकचा तर कधी गर्दीचा. यातच जर तुमची कार सुरू नाही झाली तर खूप वेळ वाया जातो. त्यामुळे तुमची कार नियमित साफ आणि स्वच्छ करा.

पाऊस पडल्यामुळे तुमच्या कारमध्ये घाण, धूळ आणि कचारा साचू शकतो. ज्यामुळे कारमध्ये तुम्हाला दुर्गंधी आणि घाणेरडेपणा येतो. यावर पर्याय म्हणजे, पाऊस पडल्यानंतर तुम्ही तुमची गाडी नेहमी धुवायला पाहिजे. पावसानंतर तुमची गाडी नीट ,स्वच्छ धूतली तर या अडचणींवर तुम्ही सहज मात करु शकतात. पावसानंतर तुमची गाडी धूताना या गोष्टींचा वापर करणे म्हत्त्वाचे आहे.

Car Wash Tips
Eye Flu Precaution : बस किंवा मेट्रोने प्रवास करताना डोळ्यांचा फ्लू टाळण्यासाठी या सेफ्टी टिप्स फॉलो करा

1. कार वॉश शॅम्पू

कार साफ करताना फक्त पाणी वापरुन चालत नाही तर त्यासोबत कार वॉश शॅम्पू वापरणे आवश्यक आहे. pH-न्यूट्रल कार वॉश शैम्पू पेंटवर्कवर योग्य आहे. तो आणि घाण आणि काजळी काढून टाकतो. मेण किंवा सीलंट काढून टाकणे आणि हे टाळण्यासाठी विशेषतः कारसाठी डिझाइन केलेले प्रोडक्ट वापरा.

2. मायक्रोफायबर वॉश मिट किंवा स्पंज वापरा

कार (Car) साफ करताना काचेची काळजी घेणे म्हत्त्वाचे असते. कार साफ करताना मायक्रोफायबर वॉश मिट किंवा स्पंज वापरा. यामुळे तुमच्या कारवर ओरखडे पडणार नाहीत. तुमची कार अगदी नवीकोरी दिसते. कार साफ करताना, व्हील क्लीनर वापरून टायर साफ करा. जे चाकांच्या फिनिशिंला धक्का न लावता ब्रेक धूळ आणि रस्त्यावरील काजळी काढून टाकते.

Car Wash Tips
Monsoon Health Tips : पावसाळ्यात फिट अँड फाईन राहण्यासाठी हळदीपासून बनवलेले हे पेय प्या, आजार दूर पळतील

3. खिडक्या आणि विंडशील्डवर थेंब साठू शकतात

पावसाचे पाणी तुमच्या कारवर खिडक्या आणि विंडशील्डवर थेंब तसेच राहू शकतात. यामुळे तुम्हाला समोरची बाजू पाहण्यात अडचण येऊ शकते. म्हणूनच कार साफ करताना खिडक्या आणि विंडशील्ड (Windshield) स्वच्छ करा.

4. कार साफ करण्यापूर्वी हे काम करा

कार साफ करताना कोणतेही प्रॉडक्ट (Product) वापरण्याच्यापूर्वी कारला पाण्याने स्वच्छ धूवून घ्या. कार नेहमी छतावरून धुण्यास सुरुवात करा. यानंतर कार स्वच्छ कोरड्या मऊ कपड्याने पुसून घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com