Migraine Problem : सततची डोकेदुखी वाढलीये? असू शकतो मायग्रेनचा त्रास, वेळीच ओळखा लक्षणे

Headache Problem : वातावरणातील बदलांचा आपल्या आरोग्यावर परिणाम होताना दिसून येतो. अधिक थंड आणि उष्ण वातावरणामुळेल आरोग्य बिघडते. त्यामुळे सर्वात आधी परिणाम होतो तो डोक्यावर.
Migraine Problem
Migraine ProblemSaam Tv
Published On

Migraine Symptoms :

वातावरणातील बदलांचा आपल्या आरोग्यावर परिणाम होताना दिसून येतो. अधिक थंड आणि उष्ण वातावरणामुळेल आरोग्य बिघडते. त्यामुळे सर्वात आधी परिणाम होतो तो डोक्यावर.

बदलेली जीवनशैली, कामाचा ताण, मानसिक आरोग्य यामुळे मायग्रेनच्या समस्येला सामोरे जावे लागते. ही समस्या सामान्य वाटत असली तरी अनेकांना याचा त्रास सहन करावा लागतो. याचा परिणाम आपल्या रोजच्या जीवनावर होतो. मायग्रेनची समस्या कशी उद्भवते. याची लक्षणे (Symptoms) कोणती? जाणून घेऊया सविस्तर

मायग्रेन हा भयंकर डोकेदुखीचा (Headache) आजार आहे. यामध्ये डोके ठणकते. ही डोकेदुखी साधारणपणे तीन ते चार तास टिकून राहाते. कधी कधी ही डोकेदुखी दिवसभर सहन करावी लागते.

Migraine Problem
Back Pain Yoga : पाठीच्या दुखण्यापासून त्रस्त आहात? नियमित करा ही ५ योगासने, मिळेल आराम

1. या कारणांमुळे अधिक त्रास होतो

  • शारीरिक हालचाली

  • लाइटचा प्रकाश

  • गोंगाट

  • तीव्र वास

2. मायग्रेन कसा टाळाल?

1. झोप घ्या

झोपच्या कमतरतेमुळे मायग्रेनची समस्या सुरु होते. अशावेळी पुरेशा प्रमाणात झोप घेणे केव्हा ही फायदेशीर (Benefits) ठरते.

Migraine Problem
Garlic Benefits: सकाळी उठल्याबरोबर खा लसणाची पाकळी, साखरेची पातळी राहिल नियंत्रणात; अनेक आजार पळतील दूर

2. कोल्ड कॉम्प्रेस

मायग्रेनच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी डोके किंवा मानेच्या भागावर कोल्ड कॉम्प्रेस लावणे फायदेशीर आहे. यामुळे वेदना कमी होतात. टॉवेलमध्ये बर्फ गुंडाळून १५ते २० मिनिटे हलक्या हाताने चोळा त्याने आराम मिळतो.

3. ताण

मायग्रेनचे सगळ्यात मोठे कारण ताण. तणावावर मात करुन आपण मायग्रेनपासून सुटका मिळवू शकतो. तणावाची पातळी कमी करण्यासाठी आणि मायग्रेनचा त्रास टाळण्यासाठी दीर्घ श्वास, औषधोपचार आणि नियमित योगासने फायदेशीर ठरतील.

Migraine Problem
Drinking Coffee Empty Stomach : रिकाम्या पोटी कॉफी पिण्याची सवय आहे? होऊ शकते आरोग्यावर परिणाम, दुर्लक्ष नकोच!

4. हायड्रेट राहा

शरीराला पुरेशा प्रमाणात पाणी न मिळाल्याने हायड्रेशनची समस्या सुरु होते. त्यासाठी हायड्रेट राहा. तसेच मायग्रेनच्या समस्या जाणवू लागल्यावर दिवसभर भरपूर पाणी प्या.

5. स्क्रीन टाइम कमी

खूप जास्त स्क्रीन टाइममुळे डोळ्यांवर ताण येतो त्यामुळे मायग्रेनची समस्या उद्भवते. अशावेळी डोळ्यांची काळजी घ्या. स्क्रीनवर कमी वेळ घालवा. नियमित ब्रेक घ्या.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com