Marriage Tips: जीवनातील 'या' गोष्टी सुधारल्या तर आयुष्यात येईल भरभराट; वैवाहिक जीवन होईल सुपर

Marriage Tips: वैवाहिक जीवन हव तितकं सोपं नसतं. लग्न झाल्यानंतर बऱ्याच गोष्टीमध्ये बदल होत असतो. वैवाहिक जीवन जगत असतांना काही इतर गोष्टींची काळजी घेणं आवश्यक असतं.
Marriage Tips: जीवनातील 'या' गोष्टी सुधारल्या तर आयुष्यात येईल भरभराट; वैवाहिक जीवन होईल सुपर
Arranged Marriage TipsSaam TV
Published On

वैवाहिक जीवन कोणत्याच व्यक्तीसाठी सोपं नसतं. या जीवनात समतोल साधून राहणं आवश्यक आहे. यामुळे ज्या व्यक्तींचं नुकतेच लग्न झाले असेल किंवा लग्न होणारं असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवलं पाहिजे. जीवनातील अनेक छोट्या- छोट्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करत असतो. कदाचित आपल्या स्वभावात काही दोष असू शक्यतो ज्यामुळे आपल्या वैवाहिक जीवनात त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशा कोणत्या गोष्टी आहेत, ते आपण जाणून घेणार आहोत.

गोपनीयता

नवरा-बायकोच्या नात्यात गोपनीयता असणं खूप गरजेचं आहे. जोडप्यामधील गोष्टी त्या जोडप्यात राहिलं पाहिजे. या गोष्टी तिसऱ्या व्यक्तीला माहिती झालं तर त्याचा त्याच्या नात्यावर परिणाम होत असतो. तिसऱ्या व्यक्तीला या गोष्टी माहिती झाल्या तर नात्यातील विश्वासनीयता कमी होत असते.

खोटं बोलणं

खोटं बोलून एखादं नातं तुम्ही जोडलं असेल तर ते नातं जास्त दिवस टिकत नाही. तसेच नात्यात खोटेपणा असला तर तुमच्या नात्यात वाद होत असतात. कोणत्याही नात्याची सुरुवात खोटं बोलून करू नये.

खर्च

पती-पत्नीच्या नात्यात नेहमी पैशांचा हिशोब क्लिअर ठेवला पाहिजे. आता पत्नी आणि पती दोघेही नोकरी करतात. त्यामुळे आर्थिक गोष्टींवर दोघांनी मिळून निर्णय घेतला पाहिजे. खर्च, गुंतवणूक, आणि बचत याबाबत तुम्ही दोघांनी मिळून योग्य निर्णय घेतला पाहिजे. दोघांची आर्थिक स्थिती कशी आहे, त्याबाबत दोघांना माहिती असले पाहिजे.

व्यसन

जर एखाद्याला कोणतं वाईट व्यसन असेल तर अशा व्यक्तीच्या नात्यात कुटता आणि वाद होत असतात. व्यसन व्यक्ती आणि नात्याला कमकुवत करत असतं. व्यसनाधीनांचे जीवन कधीच रुळावर येऊ शकत नाही. यामुळे पती असो किंवा पत्नी ते कोणत्याही प्रकारचे व्यसन करत असतील तर त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. दारूचे व्यसन असो किंवा काही इतर व्यसन असले तरी त्या व्यक्तीपासून दूर गेलेलं चांगलं असतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com