विकास काटे, ठाणे
यंदा ३१ डिसेंबरला लीप सेंकद नाही. त्यामुळे नूतन वर्षात भारतातून एकही ग्रहण दिसणार नाही. तर पुढील वर्षांत दोन पौर्णिमांना सुपरमून दर्शन दिसणार आहे. तर चाकरमान्यांसाठी सुट्यांची चंगळ असणार आहे. तसेच वर्षभरात चांगले विवाह मुहूर्त देखील आहेत,अशी माहिती खगोल अभ्यासक दा. कृ सोमण यांनी दिली आहे. (Latest Marathi News)
सोमवारी १ जानेवारी रोजी नव्या वर्षाचा प्रारंभ होत आहे. यावर्षी सन २०२३ मध्ये लिप सेकंद धरला जाणार नाही. त्यामुळे नूतन वर्षाचा प्रारंभ रविवार ३१ डिसेंबर रोजी रात्री ठिक १२ वाजता होणार आहे, अशी माहिती पंचांगकर्ते , खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितली.
सन २०२४ या नूतन वर्षाविषयी अधिक माहिती सांगताना दा. कृ. सोमण म्हणाले की, सन २०२४ हे लीप वर्ष असल्याने या वर्षात जास्त काम करण्यासाठी आपणासर्वांस एक दिवस जास्त मिळणार आहे. सन २०२४ मध्ये ३६५ ऐवजी ३६६ दिवस असणार आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सन २०२४ मध्ये (१) २५ मार्च रोजी छायाकल्प चंद्रग्रहण , (२) ८ एप्रिल रोजी खग्रास सूर्यग्रहण, (३) १८ सप्टेंबर रोजी खंडग्रास चंद्रग्रहण, (४) २ ॲाक्टोबर रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण होणार आहे. परंतू यापैकी एकही ग्रहण भारतातून दिसणार नाही.
सन २०२४ मध्ये १८ सप्टेंबर आणि १७ ॲाक्टोबर या दोन पौर्णिमांना सुपरमून ( चंद्रबिंब १४ टक्के मोठे आणि ३० टक्के जास्त प्रकाशित ) दिसणार आहेत.
सन २०२४ मध्ये २४ सार्वजनिक सुट्ट्यांपैकी २ सुट्या रविवारी येणार आहेत. २२ सुट्या इतरवारी येणार असल्याने चाकरमान्यांची सुट्ट्यांसंबंधी चंगळ होणार आहे.
सन २०२४ मध्ये सोनेखरेदी करणारांसाठी २५ जानेवारी, २२ फेब्रुवारी, २६ सप्टेंबर, २४ ॲाक्टोबर आणि २१ नोव्हेंबर असे ५ गुरुपुष्य योग येणार आहेत. गणेश भक्तांसाठी २५ जून रोजी एकच अंगारकी संकष्ट चतुर्थी योग येणार आहे.
विवाहेच्छुकांसाठी सन २०२४ मध्ये जानेवारीमध्ये १२, फेब्रुवारीमध्ये १३, मार्चमध्ये ८, एप्रिलमध्ये १०, मेमध्ये २ , जूनमध्ये २, जुलैमध्ये ६, नोव्हेंबरमध्ये ६ आणि डिसेंबरमध्ये १३ विवाह मुहूर्त दिले आहेत असे श्री. दा. कृ. सोमण यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.