Wet Clothes : पावसाळ्यात ओले कपडे सुकवण्याचं टेन्शन मिटलं; फॉलो करा या सिंपल ट्रिक्स

Wet Clothes in Monsoon : ऊन नसल्यामुळे कपडे छान वाळत नाहीत. त्यामुळे कपड्यांचा वास येतो. या सर्व समस्या सोडवण्यासाठी आम्ही आज पावसाळ्यात कपडे सुकवण्याच्या काही ट्रिक्स तुमच्यासाठी शोधल्या आहेत.
Wet Clothes in Monsoon
Wet Clothes Saam TV
Published On

पावसाळा सुरू झाला की, सर्वत्र नुसता ओलावा आणि गारवा पसरतो. पावसाळ्यात धुतलेले ओले कपडे देखील लवकर सुकत नाहीत. ऊन नसल्यामुळे कपडे छान वाळत नाहीत. त्यामुळे कपड्यांचा वास येतो. या सर्व समस्या सोडवण्यासाठी आम्ही आज पावसाळ्यात कपडे सुकवण्याच्या काही ट्रिक्स तुमच्यासाठी शोधल्या आहेत.

Wet Clothes in Monsoon
Mansoon Session : पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधक आक्रमक होणार?

कपड्यांचे ऑप्शन जास्त ठेवा

पावसाळ्यात ओल्या कपड्यांची समस्या असल्याने तुम्ही आधीच जास्तीचे कपडे घेऊन ठेवू शकता. अनेक ठिकाणी घरातील सर्व मंडळी कामाला जातात त्यामुळे कपडे नीट वळवण्यासाठी देखील वेळ नसतो. अशात तुम्ही आठवडाभराचे वेगळे कपडे आणून ठेवा. त्यामुळे धुतलेले कपडे सर्व नीट सुकेपर्यंत तुमच्याकडे दुसऱ्या कपड्यांचा ऑप्शन असेल.

कपड्यातील पाणी पिळून घ्या

घरात कपडे धुतल्यावर त्यामध्ये पाणी राहते. हे पाणी जाण्यासाठी प्रत्येक कापड हाताने छान पिळून घ्या. त्यातील जास्तीचे पाणी पूर्णतः काढून टाका. त्यानंतर कपडे सुकण्यासाठी ठेवा.

फॅन फास्ट ठेवा

बाहेर पाऊस पडत असल्याने जास्त हवा आणि उन घरात येत नाही. अशावेळी घरातील फॅन फास्ट ठेवा. जेणेकरून फॅनच्या हावेखली सर्व कपडे छान सुकून निघतील.

एसी लावू नका

काही व्यक्तींना पावसातही एसी हवा असतो. मात्र त्याऐवजी तुम्ही फॅनचा वापर करावा. कारण एसीच्या गारव्याने कपडे सुकत नाहीत आणखी जास्त ओले राहतात.

इस्त्री करा

जर तुम्हाला अर्जंट कुठे जायचे असेल आणि तुमचे कपडे थोडेफार ओले असतील तर त्यावर इस्त्री फिरवा. इस्त्री गरम असते. त्यामुळे कपडे सुकण्याठी मदत होते.

Wet Clothes in Monsoon
Mansoon Spot Near Junnar: हिरवी झाडी, फेसाळणारा धबधबा अन् निसर्गाने नटलेल्या जुन्नरजवळील 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com