
ज्योतिषशास्त्रात अंक शास्त्राला विशेष महत्व आहे. व्यक्तीचा स्वभाव, भविष्य याचे रहस्य मूलांकावरून निश्चित होते. ज्याप्रमाण व्यक्तीच्या स्वभावाचा आणि व्यक्तीमत्वाचा अंदाज राशीवरून लावता येतो, त्याचप्रमाणे संख्याशास्त्रातही संख्यांना महत्व आहे. प्रत्येक संख्या कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संबंधित आहे.
ज्या मुलींचा जन्म ६, १५ आणि २४ या तारखेला झाला आहे. अशा मुलींचा मूलांक ६ आहे त्याचा स्वामी शुक्र ग्रह आहे. सौंदर्य, प्रेम याचे प्रतीक मानले जाते यामुळेच मूलांक ६ असणाऱ्या मुली या विशेष आकर्षक असतात.
या मुलीच्या सौंदर्यामध्ये जादू असते. डोळ्यांनी घायाळ करतात. हास्यात एक वेगळीच छटा असते. या मुली सौंदर्यामुळे मुलांची मने जिंकतात. व्यक्तीमत्वाने कोणालाही मोहित करतात. या मुली भाग्यवान असतात जोडीदाराचे नशीब चमकवतात.
अंकशास्त्रानुसार, १, १०,१९ किंवा २८ तारखेला जन्मलेल्या महिलांचा अंक १ असतो. या अंकावर सूर्य देवाचे राज्य असते. जो शक्ती आणि नेतृत्वाचे प्रतीक आहे. १ मूलांक असलेल्या मुली आत्मविश्वासाने मने जिंकतात.
मूलांक १ असणाऱ्या व्यक्ती प्रभावी असतात. या मुली सर्जनशील असतात. या मुली जीवनात्मक सकारात्मक बदल घडवतात.
३,१२ २१ किंवा ३० तारखेला जन्मलेल्या मुलींचा मूलांक ३ असतो. त्याचा स्वामी ग्रह गुरू असतो. आत्मविश्वासाच्या जोरावर या मुली मोठे यश कमावतात. जोडीदीरासाठी भाग्यवान असतात.