Breakup: ब्रेकअपमुळे दु:ख नाही तर होतो फायदा; शिकायला मिळतात आयुष्याचे ५ महत्त्वाचे धडे

Love Breakup Benefits: ब्रेकअप वेदनादायक असतात, पण ते आपल्याला जीवनाचे मौल्यवान धडे देखील शिकवतात. भावनांवर नियंत्रण, नात्याची ओळख, कोणाला प्राध्यान द्यायचे या गोष्टी आपण ब्रेकअपनंतर शिकत असतो.
Love Breakup Benefits
Heartbreak isn’t the end — it’s the beginning of new life lessons.saam tv
Published On
Summary
  • ब्रेकअपमुळे केवळ दु:खच नाही तर आयुष्याचे धडे मिळतात.

  • पुढील नात्यांमध्ये अधिक सावधगिरी बाळगता येते.

  • स्वतःवर प्रेम करणं आणि आत्मजागरूकता वाढते.

  • ब्रेकअपमुळे मानसिक ताकद आणि आत्मविश्वास वाढतो.

'पुढच्यास ठेच मागचा शहाणा' अशी म्हण आपण ऐकली असेल किंवा वाचली असेल. तिच गत ब्रेकअपमुळे होत असते. आधी ब्रेकअप झालं असेल तर आपण पुढील रिलेशनशिपमध्ये सावधगिरी बाळगत असतो. ब्रेकअप झाल्यामुळे अनेकजण नैराश्यात जात असतात. आपल्या आवडत्या व्यक्ती विसरणं सहज शक्य नसतं. त्याच्या आठवणीत अनेकजण अश्रू गाळत असतात. पण वाचक मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का? ब्रेकअपमुळे फक्त दु:ख येत नाही. त्यामुळे आपल्याला काही नव्या गोष्टी शिकायला मिळतात.

बऱ्याचदा जेव्हा एखाद्या व्यक्तीचा ब्रेकअप होतो तेव्हा त्याला त्याचे आयुष्य थांबवल्या सारखे वाटते. दुःख, एकटेपणा आणि राग यासारख्या भावना त्या व्यक्तीला घेरत असतात. बरेच लोक याला आयुष्यातील सर्वात मोठी चूक किंवा अपयश मानतात. पण जर तुम्ही तुमचा दृष्टिकोन बदलला तर ब्रेकअप केवळ दुख देणारं नसतं. पण तर जीवन समजून घेण्याची आणि स्वतःला मजबूत बनवण्याची संधी देखील देत असतो. हा एक असा अनुभव असतो, जो जीवनातील ५ महत्त्वाचे धडे शिकवू शिकवून जात असतो.

स्वतःवर प्रेम आणि स्वतःवर अवलंबून राहणे

ब्रेकअप झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीला प्रथम स्वतःचे महत्त्व कळते. जेव्हा जोडीदाराचा आधार नसतो तेव्हा स्वतःवर अवलंबून राहायला शिकवते. या अनुभवावरून असे दिसून येते की आनंदी राहण्यासाठी इतरांवर नाही तर स्वतःवर विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे.

Love Breakup Benefits
Relationship Tips: नातं कसं टिकवायचं? नातेसंबंध मजबूत होण्यासाठी करा 'या' चार गोष्टी

योग्य आणि खोटं नाते ओळखण्यास मदत

ब्रेकअप आपल्याला प्रत्येक नाते कायमचे टिकणारे नसते, हे शिकवत असते. काही नाती फक्त आपल्याला हे समजावून सांगण्यासाठी येतात की आपल्याला आपल्या जोडीदारात कोणते गुण हवेत. आपल्यामध्ये कोणत्या कमतरता आहेत. प्रेमसंबंधात असताना कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, याची शिकवण सुद्धा ब्रेकअप देत असते.

Love Breakup Benefits
Fitness After 40 : चाळीशी ओलांडली? मग फिटनेस तपासण्यासाठी फक्त ४ व्यायाम ठरतील बेस्ट

भावनेवर नियंत्रण

ब्रेकअपचे दुःख खूप मोठे असते, पण हे दुःख आपल्याला भावनिकदृष्ट्या मजबूत बनवतं. ब्रेकअप आपल्याला शिकवते की आयुष्यात अडचणी येतील, पण त्यातून बाहेर पडणे हीच खरी ताकद असते. हा धडा माणसाला भविष्यातील प्रत्येक चढ-उतारासाठी तयार करतो.

प्राधान्यक्रम समजून घेणे

जेव्हा एखादे नाते संपते तेव्हा व्यक्ती स्वतःकडे आणि त्याच्या प्राधान्यांकडे पुन्हा एकदा पाहू लागते. करिअर, मैत्री, कुटुंब आणि स्वतःच्या आवडींचे महत्त्व पुन्हा एकदा लक्षात येत असतात. हे आपल्याला हे जाणवून देते की जीवन अनेक सुंदर पैलूंनी भरलेले आहे, ते फक्त एकाच नात्यावर अवलंबून नसते.

पुढे जाण्यास शिकवतो

ब्रेकअप अनेक धडे शिकवत असतो. जसे की संवाद कसा साधावा, कोणत्या चुका टाळाव्यात आणि भविष्यात नाते कसे चांगले करावे. अपयश हा शेवट नसून एका नवीन सुरुवातीचा मार्ग आहे, हेही आपल्याला शिकायला मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com