Fashion Tips : हाय हिल्स न घालता असे दिसा उंच, फॉलो करा 'या' टीप्स

प्रत्येक मोठ्या समारंभाला किंवा दैनंदिन जीवनशैलीत हिल्स या चप्पलांना महिला सहजरीत्या कॅरी करतात.
Fashion Tips
Fashion TipsSaam Tv

Fashion Tips : आजकल महिलांमध्ये हिल्स घालण्याचा ट्रेण्ड मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो. लग्न समारंभ, पार्टी, ऑफिस, डिनर अथवा शॉपिंग प्रत्येक मोठ्या समारंभाला किंवा दैनंदिन जीवनशैलीत हिल्स या चप्पलांना महिला सहजरीत्या कॅरी करतात. मात्र, हेच हिल्स अधिक वेळ घालून चालले तर पायांना सूज किंवा दुखण्यास सुरुवात होते.अशा वेळी हिल्स न घातलेलेच बरे असे वाटते.

परंतु, आपला संपूर्ण लूक पूर्ण करण्यासाठी फुटवेयर मदतगार ठरतात. मुलींसाठी प्रत्येक ड्रेसवर शोभणारे फुटवेयर मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. चप्पल, बूट, हिल्स अशा व अनेक प्रकारचे फूटवेयर मार्केटमध्ये सहज उपलब्ध आहेत. याने लूक तर पूर्ण होतोच यासह महिला स्टायलिश आणि कॉन्फिडन्ट दिसतात. कमी उंचीच्या मुली अधिकतर हिल्सचा वापर करतात. परंतु, गरजेचं नाही की हिल्सने आपली उंची दिसून येईल. जर आपल्याला उंच आणि कॉन्फिडन्ट दिसायचं असेल, तर काही टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करा.

Fashion Tips
Christmas Fashion :ख्रिसमस पार्टीला 'हटके ' दिसायचंय! तर हे फंकी लूक ट्राय करा

1. योग्य प्रिंटचे कपडे निवडणे

Printed clothes
Printed clothes canva

मोठ्या किंवा आडव्या प्रिंट असलेले कपडे घातले तर उंची कमी दिसते. उंच दिसण्यासाठी, लांब पट्टेदार प्रिंट असलेले पोशाख परिधान करा. जर तुम्ही सूट घालत असाल तर प्रिंटेड कुर्ता किंवा कमीजसोबत साधी पँट घालू शकता. याने तुमची कमी उंची दिसून नाही येणार.

2. फॅब्रिकची लांबी

fabric length
fabric length canva

उंच दिसण्यासाठी कपड्यांची लांबीही महत्त्वाची असते. जर तुमची उंची कमी असेल, तर कुर्त्याची लांबी गुडघ्यापासून थोडी खाली असावी. जर गुडघ्याच्या वर असेल तर, उंची कमी दिसते.

3. फुल स्लीव्स

full sleeve
full sleeve canva

कमी उंचीच्या मुलींनी लांब स्लीव्सचे किंवा अर्ध स्लीव्स असलेले कपडे परिधान करावे. उंच दिसण्यासाठी,फुल स्लीव्सचे ड्रेस परिधान करा.मात्र, पफ स्लीव्हज असलेले कपडे घालणे टाळा.

4. रंगाकडे विशेष लक्ष द्या

color combination
color combination canva

जर तुमची हाईट कमी आणि वजन जास्ती असेल तर काळ्या रंगाचे कपडे परिधान करावे.गडद निळा, मरून फॅब्रिक, किंवा इतर गडद रंग निवडून तुम्ही उंच दिसू शकता. याने आपण सुंदर आणि उठून दिसाल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com