Lockdown Impact on Moon: कोरोनावेळी केलेल्या लॉकडाऊनचा चंद्रावर परिणाम; भारतीय संशोधकांचं अनोखं संशोधन

Covid Lockdown Impact on Moon: भारतीय संशोधनकर्त्यांनी चंद्राच्या पृष्ठभागावरील ६ जागांचं संशोधन केलं. तेथील तापमानाचं ९ वेळा अभ्यास केला. २०१७ ते २०२३ च्या दरम्यान करण्यात आलेल्या डेटा अभ्यासात चंद्रातील तापमानात खूप अंतर पाहायला मिळालं. २०२० मध्ये चंद्रावरील तापमान सर्वत कमी होतं.
Lockdown Impact on Moon: कोरोनावेळी केलेल्या लॉकडाऊनचा चंद्रावर परिणाम; भारतीय संशोधकांचं अनोखं संशोधन
Covid Lockdown Impact on MoonSpace
Published On

कोरोनाच्या काळात लॉकडाऊनचा परिणाम चंद्राच्या तापमानावर दिसून आलाय. भारतीय संशोधकांनी याचा शोध लावलाय. रॉयल एस्टोनॉमिकल सोसायटीच्या संशोधनात सांगण्यात आलंय की, एप्रिल- मे महिन्यात २०२० च्या दरम्यान कडक लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यामुळे चंद्राच्या पृष्ठभागावर तापमानात घसरण झाली होती. फिजीकल रिचर्स प्रयोगशाळेच्या केके दुर्गा प्रसाद आणि जी अम्बीलीने २०१७ ते २०२३ च्या दरम्यान चंद्राच्या पृष्ठभागावरील सहा ठिकाणंच्या तापमानाची नोंद करण्यात आली.

दोन्ही शोधकर्तांनी ज्या ठिकाणी तापमानाची नोंद केली. त्याठिकाणी त्यापैकी, ओशनस प्रोसेलेरम, मारे सेरेनिटाटिस, मारे इम्ब्रिअम, मारे ट्रॅनक्विलिटाटिस आणि मारे क्रिसियम या दोन ठिकाणचे तापमान नोंदवले गेले. पीआरएलचे अनिल भारद्वाज म्हणाले की, आमच्या ग्रुपने एक महत्त्वाचे काम केले आहे. हे अगदी अद्वितीय आहे. हा शोध लावण्यासाठी भारतीय शोधकर्त्यांनी नासाच्या अन्वेषण ऑर्बिटर डेटाची मदत घेतली. या संशोधनात असं आढळून आलं की, लॉकडाऊनच्या काळात चंद्रावरील तापमानात कमालीचा फरक पडला होता. तेथील तापमानात ८ ते १० केल्विन ( उण २६५.१५ ते उणे २६३ .१५ डिग्री सेल्सिअस तापमान असल्याची नोंद त्यावेळी करण्यात आली होती.

Lockdown Impact on Moon: कोरोनावेळी केलेल्या लॉकडाऊनचा चंद्रावर परिणाम; भारतीय संशोधकांचं अनोखं संशोधन
Mini-Moon: पृथ्वीला मिळणार दुसरा चंद्र! लवकरच दिसणार 'मिनी-मून', खगोल अभ्यासकांसाठी दुर्मीळ संधी

लॉकडाऊन दरम्यान नोंदलेल्या तापमानाची तुलना मागील वर्षांतील तापमानाशी करण्यात आली. याबाबत प्रसाद म्हणाले,आम्ही १२ वर्षांच्या डेटाचा अभ्यास केलाय, मात्र संशोधनात २०१७ ते २०१३ पर्यंतचा डेटाच वापरला आहे. संशोधन कर्त्यांच्या मते, पृथ्वीवर लॉकडाऊन करण्यात आलं होतं. त्यावेळी पृथ्वीवर उत्सर्जन खूप कमी प्रमाणात झाले. लॉकडाऊनमुळे हरितगृह वायू आणि एरोसोल उत्सर्जनातही मोठी घट नोंदवण्यात आली आहे. याचा परिणाम असा झाला की, पृथ्वीच्या वातावरणात अशा वायूंचा प्रभाव कमी झाला आणि वातावरणातून उष्णतेचे उत्सर्जन कमी झाले.

Lockdown Impact on Moon: कोरोनावेळी केलेल्या लॉकडाऊनचा चंद्रावर परिणाम; भारतीय संशोधकांचं अनोखं संशोधन
समुद्राच्या तळाशी सापडलं एक रहस्यमयी छिद्र; यामधून बाहेर पडणाऱ्या द्रव पदार्थाने वैज्ञानिकही हैराण

या वेगवेगळ्या वर्षात या वेगवेगळ्या जागांवरील तापमानात फरक दिसला. सर्वात कमी तापमान २०२० मध्ये साइटवर २ वर आढळून आले. तर केल्विनमध्ये ९६.२ सेल्सिअस तापमान होतं. तर सर्वात कमी तापमान साइट-२ वर २०२२ मध्ये नोंदवण्यात आलं होतं. पृथ्वीवर लॉकडाऊन हटवल्यानंतर २०२१ आणि २०२१ मध्ये हळूहळू चंद्राच्या पृष्ठभागावर तापमान वाढलं होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com