Anxiety Issue In Child: लहान मुलं ही देवाची फुल असं म्हटलं जातं. बालवयात मुलांना (Child) आपण जे काही शिकवतो ते त्यांच्या मनावर कोरले जाते.परंतु, बरेचदा मुलांनी आपले ऐकावे असे पालकांना सतत वाटत असते अशावेळी ते मुलांवर रागवतात किंवा ओरडतात.यामुळे मुलांच्या मनावर कधीकधी चुकीचा परिणाम देखील होतो.
पालकांनी रागवल्यामुळे मुलांमध्ये भीती निर्माण होते. मुलाचे मन हे कोवळ्या वयात अतिशय नाजूक असते. कोणत्याही कारणांमुळे त्यांना लगेच रडू येते. तसेच त्यांना आपण रागावलो किंवा ओरडलो की, त्यांना आपली भीती वाटू लागते. यामुळे ते आपल्याजवळ येण्यासही घाबरतात.मुलांना घराबाहेर घेऊन गेल्यानंतर काही गोष्टींचे नवल वाटते तर काही गोष्टींना पाहून भीती देखील मनात निर्माण होते. अशावेळी ही भीती त्यांच्या मनात घर निर्माण करते. ज्यामुळे एन्झायटीसारख्या (Anxiety) आजाराला बळी पडतात.मुलांच्या मनात भीती निर्माण कशी होते? याचा त्यांच्या मानसिकतेवर आणि शरीरावर कसा परिणाम होतो हे जाणून घेऊया
लहान मुले एन्झायटीचा शिकार का होतात?
मुल जन्माला आल्यानंतर साधारणपणे ८ ते ९ महिने ते सहसा कोणालाही ओळखत नाही. ८ ते ९ महिना पूर्ण झाल्यानंतर मुल हे फक्त कुटुंबातील व्यक्तीची चेहरे ओळखतात.यामुळे नवीन आलेले पाहुणे मंडळी यांना मुले ही घाबरतात आणि पालकांपासून दूर जाणे त्यांना भीतीचे वातावरण निर्माण करते. आई-वडील जर कामाला जात असतील आणि दिवसभर मुल पाळणा घरात राहात असेल तर त्यांना आणखीन भीती वाटू लागते.मुलांची ही भीती पुढे वाढून त्यांना एकटे राहावे लागेल का हा देखील प्रश्न पडतो.
मुल ७ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे झाल्यास त्यांना वास्तविक जग समजू लागते. त्यांना खरे काय आणि खोटे काय यांचे ज्ञान येते यामुळे वास्तविक जीवनात घडणाऱ्या गोष्टींची मुलांना जास्त भीती वाटते. मुल साधारणपणे ५ वर्षापेक्षा जास्त असल्यास त्यांना माणसांचे हावभाव पूर्णपणे समजू लागतात. एखाद्याची वाईट किंवा आनंदी वागणण्याची वृत्ती त्यांना सहज प्रभावित करते.
१४ ते १९ वयाची मुले ही शाळा आणि मित्रमैत्रिणींच्या आयुष्याचा महत्वाचा भाग बनतात अशावेळेस त्यांना शाळेतील वातावरण हे देखील महत्वाचे असते. शाळेतील शिक्षण, मित्र आणि शिक्षक हे देखील त्यांच्या भीतीचे एक कारण असते.
जर तुमचे मुल घाबरत असेल तर तुम्ही त्याला खालीलप्रकारे मदत करू शकता
मुल समजू लागल्यास त्याला ते सुरक्षित आहे याची जाणीव करून द्या
पालकांनी मुलांना कधीही एकटे सोडू नका ज्यामुळे त्यांना भीती वाटणार नाही.
मुलांना समज द्या त्याच्यांशी बोलण्याचा त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा.
मुलांशी बोलून त्यांच्या मनातील भावना व्यक्त करायला सांगा.
मुलांना काहीवेळ पालकांनी स्वत:पासून दूर ठेवा, ज्यामुळे त्यांना घरातील इतर नातेवाईकांसोबत देखील सुरक्षित वाटेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.