Health tips : सायकलिंग करायची आहे ? कळत नाहीये इनडोअर की, आउटडोअर कोणती करावी?

सायकलिंग केल्याने शरीराचा व्यायाम होतो.
Cycling benefits, Indoor or outdoor cycling
Cycling benefits, Indoor or outdoor cycling ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Published On

मुंबई : आपल्यापैकी सगळ्यांना सायकलिंग करायला आवडते. सायकलिंग केल्याने शरीराचा व्यायाम होतो. सायकलिंग केल्याने शरीराला ताजेतवाने वाटेल.

हे देखील पहा -

आजच्या काळात व्यायाम करण्यासोबत शरीराची काळजी घेणे अधिक गरजेचे आहे. त्यासाठी आपण जीम, योगा यासारख्या व्यायामाचा पर्याय निवडू शकतो. सायकल चालवल्याने शरीराला अनेक फायदे होतात. सायकल चालवण्यासाठी आपण इनडोअर किंवा आउटडोअर कोणती करावी या भ्रमात असतो. हृदयाची गती बरी करण्यासाठी सायकल चालवणे फायदेशीर ठरते. इनडोअर की, आउटडोअर कोणती सायकल चालवणे आपल्या शरीरासाठी चांगली आहे हे जाणून घेऊया.

आपण इनडोअर किंवा आउटडोअर सायकलिंगमधून किती कॅलरी बर्न करता येईल यावर अंवलबून असते. आपण कोणत्या प्रकारच्या सायकलिंगची निवड करतो यापेक्षा इतर अनेक असते. आपले वजन, सायकल चालवण्याचा वेग व त्याची तीव्रता किंवा व्यायाम करताना त्यानुसार ते बदलू शकते. परंतु, घरामध्ये सायकल चालवण्यापेक्षा बाहेरच्या सायकलिंगमुळे जास्त कॅलरी बर्न होते.

Cycling benefits, Indoor or outdoor cycling
Health tips : शरीर सुदृढ ठेवण्यासाठी योगासने करताय ? जाणून घ्या त्याच्याबद्दल महत्त्वाच्या गोष्टी

वर्कआउट निवडण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे सर्वसाधारणपणे आपली जीवनशैली आणि विशेषतः परिस्थिती कशी अनुकूल हे पाहणे. पावसाळ्यात आपण इनडोअर सायकलिंगचा पर्याय निवडू शकतो तर उन्हाळा आणि हिवाळ्यात आउटडोअरचा पर्याय निवडू शकतो. जीममध्ये सायकल चालवताना आपल्याला त्याचा वेग कमी जास्त करता येते परंतु, घराबाहेर सायकल चालवताना आपल्या चालवण्याची तीव्रता वाढवता येत नाही. इनडोअर सायकलिंगमध्ये कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. इनडोअर आणि आउटडोअर सायकलचे आरोग्यास (Health) अनेक फायदे (Benefits) आहेत.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com