Friendship Day 2024 : आज साजरी करुयात मैत्री! जाणून घ्या फ्रेंडशिपचे महत्त्व आणि इतिहास

International Friendship Day 2024 : आंतराष्ट्रीय मैत्री दिवस हा ३० जुलै ला जागतिक स्तरावर साजरा केला जातो, परंतु हा दिवस भारतात ऑगस्टच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो.
International Friendship Day 2024
Friendship Day 2024 Saam Tv
Published On

विश्वातील सर्वात निस्वार्थी नातं हे मैत्रीचं नातं. कोणत्याही गोष्टीचा स्वार्थ आणि भेदभाव न करता मैत्रीचं नातं एकमेंकाना कायम बांधून ठेवते. याच मैत्रीचे नाते साजरे करण्यासाठी आज जगभरात 'फ्रेंडशिप डे' साजरा केला जातो.

International Friendship Day 2024
Friendship Day 2024 : खरा मित्र कसा असावा? वाचा, आचार्य चाणक्य काय सांगतात

फ्रेंडशिप डे हा दिवस वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या ३० जुलैला साजरा केला जातो,मात्र हा दिवस भारतात ऑगस्ट (August)महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो.प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात त्याला प्रेमाचं, विश्वासाच आणि सुख-दु:खात कुणी तरी हव असत. त्यातील मैत्री हे एक असे नाते आहे ज्याचा धागा प्रत्येक व्यक्तीला स्वत: विणावा लागतो.

मैत्री हे नातं जगातील सर्वात मौल्यवान आणि सुंदर शिवाय नि:स्वार्थ बंधनांपैकी एक मानले जाते.आपण आपले प्रत्येक क्षण आपल्या मित्रांसोबत शेअर करतो, मग हे क्षण आनंदाचे असो किंवा दु:खाचे. जेव्हा आपल्याला कधी रडण्यासाठी खांद्याती गरज असते तेव्हा आपल्या मनात पहिला माणून हा आपला खरा मित्र असतो.

आजचा दिवस आपल्या मित्रांचा सन्मान तसेच आदर आणि प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी साजरा केला जातो. फ्रेंडशिप डे हा दिवस ऑगस्ट महिन्याताली पहिल्या रविवारी साजरा करण्यात येत असतो. यंदा हा दिवस 4 ऑगस्ट २०२४ रोजी साजरा करण्यात येत आहे.

फ्रेंडशिप डेची कल्पना...

फ्रेंडशिप डे म्हणजे मैत्रीच्या (Friend)दिवसाची विशेष कल्पना पहिल्यांदा जॉयस हॉल अर्थात (हॉलमार्क कार्ड्सचे संस्थापक) यांनी साधारण १९३० मध्ये सादर केली.यापूर्वी ग्रीटिंग कार्ड नॅशनल असोसिएशनने १९२० मध्ये ग्रीटिंग कार्डची नागरिकांमध्ये विक्री वाढवण्याच्या संकल्पनेतून याला चालना देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर प्रत्येक नागरिकांना ते समजले आणि ही संकल्पना फोल ठरील. पुढे साधारण १९५८ मध्ये जागतिक फ्रेंडशिप क्रुसेडनेही फ्रेंडशिप डेची कल्पना मांडील मात्र ही यशस्वी झाली नाही.

अखेरीस,२०११ मध्ये, संयुक्त राष्ट्र संघाना ३० जुलै(JULLY) ही तारीख जागतिक फ्रेंडशिप डे म्हणून घोषित केली. त्या दिवशी पासून विविध देशात वेगवेगळ्या तारखांना फ्रेंडशिप डे साजरा करण्यात आला आहे. पंरतू भारतात फ्रेंडशिप डे हा दिवसा ऑगस्टच्या पहिल्या रविवारी साजरा करण्यात येतो.

International Friendship Day 2024
Friendship Day 2024 : स्वस्तात मस्त युनिक गिफ्ट आयडिया, दोस्त होतील खुश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com