ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिंदूधर्मात, श्रावण महिन्याला महादेवाच्या उपासनेसाठी अत्यंत शुभ मानले जाते.
प्रदोष व्रत हे महादेवाच्या पूजेसाठी अत्यंत शुभ मानले जाते.
यंदा 1 ऑगस्ट रोजी प्रदोष व्रत केलं जाणार आहे या दिवशी महादेवाची पूजा केली जाते.
श्रावणात योग्य पूजा आणि उपासना केल्यामुळे तुमच्या आयुष्यात दुप्पट फळ मिळतं.
प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवाची मनापासून योग्य पूजा केल्यामुळे तुमच्या घरातील आर्थिक संकट दूर होते.
प्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी महादेवाची पूजा करताना शिव स्तोत्राचे पठण केले जाते.
प्रदोष व्रताची पूजा करताना संध्याकळी संपूर्ण घरामध्ये कापूर जाला त्यामुळे घरातील सकारात्मकता वाढते.
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.