Battery Swapping Policy : बॅटरी स्वॅपिंग पॉलिसी म्हणजे काय? इलेक्ट्रिक वाहन धारकांसाठी खूशखबर! जाणून घ्या

EV Battery Swapping Policy : बॅटरी स्वॅपिंग एक अशी टेक्नोलॉजी आहे, ज्यात डिस्चार्ज करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीला आधीच चार्ज करण्यात आलेल्या बॅटरीला बदलणे.
Battery Swapping Policy
Battery Swapping Policy Saam Tv
Published On

What is the battery swapping process : 2022 मध्ये बॅटरी स्वॅपिंग धोरण हा चर्चेचा विषय होता, कारण केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2022 चा अर्थसंकल्प सादर करताना EVs ला प्रोत्साहन देण्यासाठी लवकरच बॅटरी स्वॅपिंग धोरण लागू करणार असल्याची घोषणा केली. स्वॅपिंग पॉलिसी काय आहे आणि EV वापरकर्त्याला त्याचा कसा फायदा होईल याबद्दल पाहूयात, जेणेकरून भविष्यात तुम्ही तुमची EV वापरत असाल तर तुम्हाला नक्कीच त्याचे फायदे कळले पाहिजेत.

काय आहे बॅटरी स्वॅपिंग

बॅटरी स्वॅपिंग एक अशी टेक्नोलॉजी आहे, ज्यात डिस्चार्ज करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीला आधीच चार्ज (Charge) करण्यात आलेल्या बॅटरीला बदलणे. जसे की, संपूर्ण भारतात आयल फिलिंग स्टेशन असतात. ठीक त्याच प्रमाणे संपूर्ण भारतात बॅटरी स्वॅपिंग स्टेशन पाहायला मिळू शकतात. म्हणजेच बॅटरीला लवकरच बदलता येऊ शकते.

तुमचा प्रवास कोणत्याही अडथळ्याविना आनंदी होऊ शकतो. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास आधी मोबाइलमध्ये बॅटरी संपायला आली की नवीन चार्ज केलेली बॅटरी मोबाइल मध्ये टाकली जात असायची. मग फोन मध्ये बॅटरी फुल असायची. पुन्हा मोबाइल (Mobile) मधून काढलेली बॅटरी चार्जिंगला लावायची. ही संपली की ती लावायची

Battery Swapping Policy
EV Care Tips in Monsoon : इलेक्ट्रिक बाइक वापरताय? पावसाळ्यात अशी घ्या काळजी

बॅटरी स्वॅपिंग धोरण काय आहे?

बॅटरी स्वॅपिंग पॉलिसी ही अशीच एक पॉलिसी आहे ज्याचा उद्देश EV वापरकर्त्यांचा वेळ, पैसा आणि रेंजचा आनंद वाचवणे हे आहे. बॅटरी स्वॅपिंग हा एक पर्याय आहे ज्यामध्ये EV मालक चार्ज केलेल्या बॅटरीची डिस्चार्ज केलेल्या बॅटरीसोबत देवाणघेवाण करू शकतात.

बॅटरी स्वॅपिंग पॉलिसी अंतर्गत, ईव्ही वापरकर्त्याला विविध ठिकाणी बॅटरी (Battery) स्वॅपिंग मशीन मिळेल, जिथे तो त्याची मृत बॅटरी काढून ती चार्जमध्ये ठेवू शकतो आणि चार्ज केलेली बॅटरी त्याच्या वाहनात ठेवू शकतो. भारतात अशा काही कंपन्या आहेत ज्या येथे स्वॅपिंग स्टेशन चालवत आहेत तर अनेक कंपन्या त्याच्या सेटअपसाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत.

फक्त छोट्या ईव्हींनाच फायदा मिळेल का?

बॅटरी स्वॅपिंग पॉलिसी फक्त लहान वाहनांसाठी उपलब्ध असेल, विशेषत: दुचाकी आणि तीनचाकी अशा छोट्या वाहनांसाठी. कारण या वाहनांमध्ये लहान बॅटरी आहेत ज्या इतर ऑटोमोटिव्ह सेगमेंटच्या तुलनेत बदलणे सोपे आहे.

Battery Swapping Policy
EV Charging Tips : Electric Vehicle चार्ज करताना या चूका टाळा अन्यथा बॅटरीचे लाईफ होईल कमी

बॅटरी स्वॅपिंग पॉलिसीचा फायदा काय आहे?

भारतात ईव्ही उद्योग अजूनही नवीन आहे आणि लोक त्यांच्या ईव्ही चार्ज करण्यासाठी धडपडत आहेत. अशा परिस्थितीत या धोरणांतर्गत अनेक स्टार्टअप्स यामध्ये गुंतवणूक करतील आणि ठिकठिकाणी स्वॅपिंग स्टेशन्स उभारतील.

बॅटरी स्वॅपिंगमुळे लोकांचा वेळ वाचेल, कारण EV चार्ज होण्यासाठी 5-6 तास लागतात, पण स्वॅप करून, तुम्ही तुमचे वाहन 4-5 मिनिटांत त्याच उर्जेने पुन्हा रस्त्यावर आणू शकता. बॅटरी स्वॅपिंग प्रक्रियेमुळे बॅटरी संपण्याची, चार्जिंग पॉइंट्स शोधणे आणि नवीन बॅटरी पॅक खरेदी करण्याचा खर्च टाळला जातो, ज्यामुळे इलेक्ट्रिक वाहन वापरकर्त्यांच्या खिशावरचा भार कमी होतो.

या धोरणाचा ईव्ही क्षेत्रावर कसा परिणाम होईल?

स्वॅपिंग व्यवसायाच्या विकासामुळे, इलेक्ट्रिक (Electric) स्कूटर खरेदीदार बॅटरीशिवाय स्कूटर खरेदी करू शकतील आणि बॅटरी स्वॅपिंग सेंटरमध्ये जाऊन स्कूटर किंवा इतर इलेक्ट्रिक वाहन नाममात्र किमतीत भाड्याने घेऊन स्कूटर चालवू शकतील.

या धोरणाच्या अंमलबजावणीमुळे होणारा सर्वात मोठा फायदा म्हणजे वेळ. कारण बॅटरी स्वॅपिंगला खूप कमी वेळ लागतो, तर ईव्ही चार्जिंगला काही तास लागतात. यामुळे लोकांचा आत्मविश्वास ईव्हीप्रमाणे वेगाने वाढेल आणि ईव्हीची मागणी झपाट्याने वाढेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com