WhatsApp Digi locker : चलन कट होण्याचे टेन्शन नॉट ! Driving License, RC सतत सोबत ठेवण्याची गरज नाही, WhatsApp च्या एका क्लिकवरुन होईल काम...

Driving License & RC On WhatsApp : ड्रायव्हिंग लायसन्स व रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि इन्श्युरन्स सोबत नसल्यास तुमचे पैसे कापले जातात.
WhatsApp Digi locker
WhatsApp Digi lockerSaam tv
Published On

Driving License : देशात ट्राफिकचे नियम हे अधिक कडक करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत ड्रायव्हिंग लायसन्स व रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि इन्श्युरन्स सोबत नसल्यास तुमचे पैसे कापले जातात. ज्यामुळे ट्राफिक पोलिस तुमचे ऐकत देखील नाही व यामुळे दुचाकी किंवा कार चालकाला 1000 ते 5000 रुपयांचा दंड भरावा लागतो.

पण आता जर तुमच्याकडे DL, RC आणि विम्याची (Insurance) कोणतीही कागदपत्रे नसली तरी वाहतूक पोलिस तुमचे चलन कापू शकणार नाहीत. यासाठी तुमच्या फोनमध्ये (Phone) फक्त WhatsApp असणे आवश्यक आहे.

WhatsApp Digi locker
2000 Notes Exchange Process : SBI कडून नवं अपडेट ! कशी असेल 2000 रुपयांची नोट बदलण्याची प्रोसेस, जाणून घ्या सविस्तर

1. व्हॉट्सअॅपवरुन प्रोसेस कशी ?

  • जर तुमच्या व्हॉट्सअॅपमध्ये डिजीलॉकरची सेवा उपलब्ध असेल तर तुम्हाला काळजी करण्याचे कारणं नाही

  • कार आणि दुचाकी चालवणारे WhatsApp च्या माध्यमातून MyGov हेल्पडेस्क चॅटबॉटवर Digi Locker सेवेचा आनंद घेऊ शकतात.

  • डिजीलॉकरमध्ये कागदपत्रे आधी अपलोड करावी लागतात.

  • तुम्ही डिजीलॉकर अॅपवर सर्व कागदपत्रे आधीच अपलोड केली असतील तर डिजीलॉकर सेवा व्हॉट्सअॅपद्वारे वापरता येऊ शकते.

  • तुम्ही तसे केले नसेल तर, आधी तुम्हाला डिजीलॉकर अॅपमध्ये डीएल, आरसी आणि इन्शुरन्स की कॉपी डाउनलोड कराव्या लागतील.

  • यानंतर ही कागदपत्रे वाहतूक पोलिसांना कधीही दाखवू शकता. सर्व DigiLocker कागदपत्रे सर्वत्र वैध आहेत.

WhatsApp Digi locker
How To Increase Cibil Score: कर्ज घ्यायचयं? पण क्रेडिट स्कोर बिघडलाय ? कसा सुधारवाल तुमचा 'क्रेडिट स्कोर'

2. कसे कराल डॉक्युमेंट डाउनलोड ?

  • यासाठी आपल्याला MyGov Help Desk चा चॅटबॉट क्रमांक 9013151515 तुमच्या फोनमध्ये सेव्ह करावा.

  • त्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअॅप ओपन करून न्यू चॅट पर्यायावर जावे लागेल.

  • यानंतर वापरकर्त्यांना MyGov हेल्पडेस्क चॅटमध्ये Hi चा मेसेज करावा लागेल.

  • त्यानंतर चॅटमध्ये तुम्हाला डिजीलॉकर सेवा निवडावी लागेल.

  • त्यानंतर तुम्हाला डिजिलॉकर खात्याची माहिती देखील द्यावी लागेल.

  • डिजीलॉकर खाते आधार कार्डच्या 12 अंकी क्रमांकाशी लिंक करावे लागते.

  • यानंतर नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून ओटीपीची पडताळणी करावी लागेल.

  • यानंतर, ChatBot सूचीमध्ये कागदपत्रे डिजिलॉकर खात्याशी जोडली जातील.

  • त्यानंतर डॉक्युमेंट डाऊनलोड करुन टाइप करा व दुसऱ्याला पाठवण्याचा पर्याय दिसेल. तिथून ते डॉक्युमेंट डाउनलोड करता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com