नवी दिल्ली: देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच कोरोनच्या नव्या ओमिक्रॉन (Omicron) या व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. भारतात गेल्या 24 तासात कोरोनाचे 1,68,063 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, गेल्या 24 तासात 277 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, या कालावधीत 69,959 जण संसर्गातून बरे झाले आहेत. तर, नवीन प्रकरणांनंतर, सक्रिय रुग्णांची संख्या वाढून 8,21,446 झाली आहे. (India Corona Latest News Update)
सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात
राज्यात गेल्या 24 तासात 33 हजार 470 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तसेच 29,671 कोरोनमुक्त झाले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण 69,53,514 कोरोनाबाधित रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत. सध्या राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 94.98 टक्के आहे.
गेल्या 24 तासात 8 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 2.04 टक्के एवढा आहे. सध्या राज्यात 2,06,046 रुग्ण अॅक्टीव आहेत. आतापर्यंत 1,41,647 रुग्णांना कोरोनामुळे आपला जिव गमवावा लागला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाची तिसरी लाट सुरु झाली असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर त्यांनी कोरोनाची तिसरी लाट जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात कमी होईल असे संकेत देखील दिले आहेत.
ओमिक्रॉनची लागण झालेल्यांची संख्या 4 हजारांवर
देशात कोव्हिड-19 च्या ओमिक्रॉन या नवीन प्रकाराने संक्रमित लोकांची संख्या देखील वेगाने पसरत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, या व्हेरिएंटच्या 4,461 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.