भारतावर संसर्गजन्य कॅन्सरचं संकट, 23 लाख रुग्णांना व्हायरल कॅन्सर

HPV, H Pylori and Viral Infections Linked to Cancer: एका प्रसिद्ध नियतकालिकाच्या कॅन्सरसंदर्भातल्या अहवालानं जगभरात खळबळ उडवलीये. कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराच्या निदानाबाबत धक्कादायक खुलासा समोर आलंय. कुणी केलाय हा खुलासा?... अहवालात नेमकं काय म्हटलंय?...
LANCET REPORT ON INFECTION-RELATED CANCER CASES IN INDIA
LANCET REPORT ON INFECTION-RELATED CANCER CASES IN INDIAsaam tv
Published On: 

कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारामुळे जगभरात दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो. कॅन्सरवर मात करण्यासाठी लस विकसित करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. मात्र, कॅन्सरबाबत आता वैद्यकीय जगतातून धडकी भरवणारी माहिती समोर आलीये. जगप्रसिद्ध वैद्यकीय नियतकालिक ‘द लॅन्सेट’नं कॅन्सरबाबत खळबळजनक खुलासा केलाय. कॅन्सरचा धोका वाढवण्यास कारणीभूत ठरत असलेल्या जीवाणू-विषाणूबाबत ‘द लॅन्सेट’नं एक अहवाल प्रसिद्ध केलाय. या अहवालात काय नमूद करण्यात आलंय ते पाहूयात...

विषाणू संसर्गामुळे कॅन्सरची लागण

जगात एकूण 23 लाख संसर्गजन्य कॅन्सरचे रुग्ण

भारतातील सुमारे 1 लाख 90 हजार रुग्णांना विषाणू आणि जीवाणूंच्या संसर्गामुळे कॅन्सरची लागण

HPV मुळे 1 लाखाहून अधिक रुग्णांना गर्भाशय मुखाचा कॅन्सर

47 हजार रुग्ण 'हेलिकोबॅक्टर पायलोरी' पोटातील जिवाणूंमुळे कॅन्सरग्रस्त

22 हजार जण 'एपस्टाईन-बार व्हायरस'मुळे कॅन्सरग्रस्त

10 हजार जण 'हेपॅटायटीस बी'मुळे कॅन्सरग्रस्त

5 हजार 300 जण 'हेपॅटायटीस सी'मुळे कॅन्सरग्रस्त

विशेष म्हणजे, सरकारकडून राष्ट्रीय 'HPV' लसीकरण कार्यक्रम सुरू केलाय. या पार्श्वभूमीवर कॅन्सर तज्ज्ञांनी महत्त्वाचं आवाहन केलंय... कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये संसर्गजन्य कॅन्सरचे प्रमाण 77 टक्के असल्यानं कॅन्सर प्रतिबंधाला अधिक महत्त्व आल्याचंही 'द लॅन्सेट'नं म्हटलंय. 2050 पर्यंत जगभरात संसर्गजन्य कॅन्सर रुग्णांची संख्या कोट्यवधींच्या घरात जाण्याची भीती या अहवालात वर्तवण्यात आलीये. त्यामुळे सर्दी-खोकल्यासारखा संसर्गजन्य आजार बनू पाहणाऱ्या कॅन्सरला रोखण्याचं जगासमोर आव्हान असणार आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com