Panchang Today: कृष्ण पंचमी, खरेदीसाठी शुभ दिवस; जाणून घ्या मुहूर्त आणि लकी राशी

Krishna Panchami auspicious: आज कृष्ण पंचमीचा दिवस असून हा दिवस खरेदीसाठी अत्यंत शुभ मानला जातो. हिंदू पंचांगानुसार या दिवशी केलेली खरेदी दीर्घकाळ टिकते आणि घरात समृद्धी आणते, असे मानले जाते.
Panchang today horoscope
Panchang today horoscopeSAAM TV
Published On

आज ६ फेब्रुवारी २०२६ शुक्रवार असून फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाचा पाचवा दिवस आहे. परंपरेनुसार या दिवशी वाहन, दागिने, नवीन कपडे, गॅझेट्स किंवा मेकअप खरेदी करणं शुभ मानण्यात येतं. कृष्ण पक्षातील पंचमी तिथी, हस्त नक्षत्र आणि धृति योग यांचा प्रभाव आज राहणार आहे.

चंद्र कन्या राशीत असल्यामुळे आरोग्य आणि नियोजनाशी संबंधित निर्णय घेण्यासाठी दिवस अनुकूल असणार आहे. विचारपूर्वक आणि पद्धतशीर कामं केल्यास चांगले परिणाम मिळू शकतात. पाहूयात आजचं पंचांग, मुहूर्त आणि शुभ राशी काय आहेत?

आजचं पंचांग

  • तिथी: कृष्ण पंचमी

  • पक्ष: कृष्ण पक्ष

  • वार: शुक्रवार

  • नक्षत्र: हस्त

  • योग: धृति

  • करण: कौलव

  • चंद्र राशि: कन्या

  • ऋतु: शिशिर

सूर्य आणि चंद्र गणना

  • सूर्योदय: 07:05:21 AM

  • सूर्यास्त: 06:17:53 PM

  • चंद्रोदय: 10:33:13 PM

  • चंद्रास्त: 09:42:49 AM (पुढील दिवस)

हिंदू कालगणना

  • शक संवत: 1947

  • विक्रम संवत: 2082

  • मास (अमान्ता): माघ

  • मास (पुर्णिमान्ता): फाल्गुन

Panchang today horoscope
Surya Gochar: 10 वर्षांनी सूर्य करणार बुध ग्रहाच्या नक्षत्रामध्ये बदल; 'या' 3 राशींचा गोल्डन टाईम होणार सुरु

आजचे शुभ मुहूर्त

अभिजीत मुहूर्त:

12:19:00 PM ते 01:03:00 PM

आजचे अशुभ मुहूर्त

राहु काल: 11:17:33 AM ते 12:41:37 PM

यमघंट काल: 03:29:45 PM ते 04:53:49 PM

गुलिकाल: 08:29:25 AM ते 09:53:29 AM

आज कोणत्या चार राशींना दिवस विशेष चांगला आहे?

कन्या रास

चंद्र तुमच्या राशीत असल्यामुळे आत्मविश्वास आणि निर्णयक्षमता वाढणार आहे. कामातील अचूकता आणि शिस्त यामुळे चांगले परिणाम दिसून येणार आहे.

वृषभ रास

आर्थिक बाबतीत स्थैर्य मिळू शकणार आहे. नियोजनबद्ध खर्च आणि बचत यामुळे समाधान वाटणार आहे. कुटुंबाशी संबंधित निर्णय सकारात्मक ठरणार आहे.

Panchang today horoscope
Shani Margi: 30 वर्षांनंतर शनीदेव गुरुच्या घरात प्रवेश; 'या' राशींचा सुरु होणार गोल्डन टाईम

मकर रास

कार्यक्षेत्रात जबाबदारी वाढेल पण ती यशस्वीपणे पार पाडू शकणार आहात. वरिष्ठांकडून विश्वास आणि सहकार्य मिळू शकते.

तूळ रास

संबंध आणि भागीदारीत समतोल राखता येणार आहे. चर्चा आणि समन्वयातून फायदे मिळू शकणार आहेत. सर्जनशील कामांसाठी दिवस अनुकूल आहे.

Panchang today horoscope
Shani Uday: 30 वर्षांनंतर शनी गुरूच्या राशीत होणार उदय; या राशींचा गोल्डन टाईम होणार सुरु

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com