Weight Loss Tips : भात खाल्ल्याने वजन वाढतं? तुम्हालाही असंच वाटत असेल तर ही बातमी वाचाच

Know Which Type Of Rice Is Best For Weight Loss : वजन वाढण्यामागे भात खाण्यचे प्रमाण नव्हे, तर तो कोणता भात आहे हे महत्त्वाचं आहे. योग्य तांदूळ निवडा आणि वजन नियंत्रणात ठेवा.
Which type of rice is best for weight loss
Which type of rice is best for weight lossFreepik/istock
Published On

प्रत्येक भारतीयाच्या जेवणात भाताचा समावेश असतोच. याशिवाय जेवण पूर्ण होत नाही. पण जास्त प्रमाणात भात खाल्ल्याने वजन वाढतं असं म्हटलं जातं. यामुळे वजन कमी करायचा असल्यास अनेकजण भात खाणे टाळतात. पण तुम्हाला माहीत आहे का? तुमचे वाढते वजन तुम्ही किती भात खाताय, यावर नाही तर तुम्ही कोणत्या प्रकारचा भात खाताय यावर अवलंबून आहे. म्हणूनच वजन कमी करण्यासाठी किंवा नियंत्रित ठेवण्यासाठी तुम्ही योग्य तांदळाची निवड करणे आवश्यक आहे.

Which type of rice is best for weight loss
cholesterol control : कोलेस्ट्रोल राहिल नियंत्रित आणि वजन होईल झटाझट कमी, डाएटमध्ये करा या एका धान्याचा समावेश

काही प्रकारच्या तादंळामध्ये फायबर आणि न्यूट्रिशनचे प्रमाण जास्त असते. तसेच अशा भाताचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. लाल तांदळामध्ये मोठ्याप्रमाणात फायबर आणि एंथोसायनिन सारखे अँटीऑक्सीडंट्स असतात. ज्यामुळे पोट जास्त काळ भरून राहते. सारखी भूक लागत नाही आणि अतिरिक्त खाणे टाळले जाते. शिवाय फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पचनसंस्थाही सुधारते. या तांदळाचा भात तुम्ही वाफवलेल्या भाज्या, सॅलेड किंवा हलक्या मसालेदार जेवणासह खाल्ल्यास उपयोगी ठरेल.

तपकिरी तांदूळ म्हणजेच ब्राऊन राइस. अनेक न्यूट्रिशियन्स शक्यतो वजन कमी करण्यासाठी आहारात ब्राऊन राइसचा समावेश करण्याचा सल्ला देतात . यामध्ये सुद्धा लाल तांदळाप्रमाणे फायबर, पोषक तत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. तुम्हाला भात खाणे आवडंत असेल तर, तुम्ही तुमच्या जेवणात पांढऱ्या तांदळाऐवजी ब्राऊन राइसचा समावेश करू शकता. या तांदळामध्ये मॅग्नेशियम आणि सेलेनियम यांसारखे खनिजेही असतात. जे वजन कमी करण्यास उपयोगी ठरतात. शिवाय रक्तातील साखर नियंत्रित राहते.

Which type of rice is best for weight loss
Woman Health Care :प्रत्येक महिलेने हे ५ सूपरफूड खायलाच हवेत, वाचा काय काय फायदे होतील

वजन कमी करण्यासाठी काळा तांदूळ देखील एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये पांढऱ्या तांदळापेक्षा कमी कॅलरीज असतात. हा काळा भात तुम्ही मसूर किंवा कमी तेलात बनवलेल्या भाज्यांसोबत खाऊ शकता. याशिवाय नेहमीच्या पांढऱ्या तांजळाऐवजी बासमती तांदूळही एक चांगला पर्याय ठरेल. साध्या पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत बासमती तांदळाचा ग्लायमेसिक इंडेक्स कमी असतो. यामुळे तो रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवत नाही. वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

Which type of rice is best for weight loss
Garlic Oil : हाडे आणि सांध्यांच्या आरोग्यासाठी लसूण तेल ठरते फायदेशीर

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com