कांचन सोनावणे - साम टीव्ही
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी 'सेम' असतं ! मंगेश पाडगावकरांनी सांगितल्या प्रमाणे प्रेम ही अव्यक्त भावना आहे. प्रेम या शब्दात संपूर्ण विश्व सामावलं आहे. प्रेमाला ना रंग ना रूप ना वयाच बंधन असतं. जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात बसून कोणावरही प्रेम करता येतं. प्रेमात स्वार्थ नसेल तर ते दिवसेंदिवस बहरत जातं.
आजकाल मोठ्या प्रमाणात अनेकांचे ब्रेकअप होत असतात. सगळ्या नात्यांमध्ये काळजी, प्रेम, राग हे असते. पण या पलिकडे जाऊन आयुष्यभराची साथ महत्त्वाची असते. कोणतेही नाते जोडण्यापूर्वी त्याचा विचार करणे खूप महत्त्वाचे आहे. आपल नातं कॅज्युअली घेणे रिलेशनशिपसाठी घातक ठरू शकते. मात्र प्रेमात पडताना किंवा एखाद्या रिलेशनशिपमध्ये असताना मुलींनी मुलांमधील कोणते गुण पाहावे जाणून घेऊयात.
मुलाचा स्वभाव
नात्यामध्ये आनंदी राहणे हे खूप गरजेचे असते. तो तुमच्याशी कशा पद्धतीने वागतो, किती समजूतदारपणाने तुम्हाला एखादी गोष्ट सांगतो. या सगळया गोष्टीचं तुम्ही गांभीर्यांने निरीक्षण करा. तो तुमच्या दोघांच्या भविष्याबद्दल किती जागरूक आहे हे समजून घ्या.
मुलाचा समजूतदारपणा
आपल्याला समजून घेणारे फार कमी लोकं असतात. परंतु त्याने आपण जसे आहोत तसे स्वीकारणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. तो तुमच्या घरच्यांशी कशा पद्धतीने बोलतो, त्यांना किती समजून घेतो, कशाप्रकारे गोष्टी हातळतो, परिस्थितीशी कसे जुळवून घेतो या सर्वाचे निरीक्षण करा.
मुलाला कोणतं व्यसन आहे का?
हल्लीच्या रिलेशनशिपमध्ये अनेक गोष्टी सामान्य झाल्या आहेत. पण मुलाला कोणत व्यसन नाही ना याची पूर्व कल्पना करून घ्यावी. कारण भविष्यात कोणत्या समस्या नको.
मुलगा विश्वासू असावा
कोणत्याही नात्याचा पाया हा विश्वासावर टिकून असतो. मुलींनी रिलेशनशिपमध्ये आल्यावर भविष्याचा देखील विचार करावा. एकमेकांवर अपार विश्वास ठेवावा. तुम्हाला कोणत्याही विषयावर त्यांच्याशी मनमोकळेपणे बोलता आलं पाहिजे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.