Bhadrapada Amavasya 2025: आजच्या शनी अमावस्येचं महत्त्व जाणून घ्या; 'या' चुका करणं टाळा

Shani Amavasya significance: हिंदू धर्मात प्रत्येक अमावस्येला विशेष महत्त्व आहे, पण जेव्हा अमावस्या शनिवारी येते, तेव्हा तिला शनि अमावस्या किंवा शनिश्चरी अमावस्या असे म्हणतात.
Rajyog 2025
Rajyog 2025saam tv
Published On

हिंदू धर्मात प्रत्येक अमावस्येला विशेष महत्त्व दिलं जातं. या दिवशी पितरांसाठी श्राद्ध, तर्पण आणि दान केल्याने पुण्य मिळतं आणि पूर्वजांचे आशीर्वाद लाभतात. मात्र काही अमावस्या खास मानल्या जातात. त्यामध्ये भाद्रपद महिन्यातील अमावस्या प्रमुख आहे. या अमावस्येला पिठोरी अमावस्या आणि कुशाग्रहणी अमावस्या असंही म्हणतात.

या वर्षी भाद्रपद अमावस्या २३ ऑगस्ट म्हणजेच शनिवारी आहे. शनिवारी ही अमावस्या आल्यामुळे तिला शनी अमावस्या असंही म्हटलं जातं.

भाद्रपद अमावस्येचा स्नान-दानाचा मुहूर्त

पंचांगानुसार, भाद्रपद अमावस्या तिथि २२ ऑगस्ट शुक्रवार सकाळी ११:५५ वाजता सुरू होऊन २३ ऑगस्ट शनिवार सकाळी ११:३५ वाजता संपणार आहे. उदयातिथीनुसार, अमावस्या २३ ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी स्नान-दानाचा मुहूर्त २३ ऑगस्टच्या पहाटे ४:२६ ते ५:१० वाजेपर्यंत असणार आहे. या वेळेत पवित्र नदीत किंवा तलावात स्नान केलं पाहिजे, सूर्यदेवाला अर्घ्य द्यावं, पितरांना तर्पण करावं आणि गरजू, गरीबांना अन्न-वस्त्रांचं दान करावं.

Rajyog 2025
Malavya Rajyog 2025: 50 वर्षांनंतर चमकणार 'या' राशींचं नशीब; मालव्य आणि बुधादित्य राजयोग मिळवून देणार धनलाभ

शनि अमावस्येला या गोष्टी करू नका

नशा आणि तामसिक अन्न टाळा

या दिवशी दारू, मांसाहार किंवा कुठल्याही नशेचं सेवन करू नये. असं केल्याने शनि देव रागावतात आणि पितरही अप्रसन्न होतात.

खोटं बोलू नका

शनि देव न्यायाचे देवता मानले जातात. त्यामुळे या दिवशी खोटं बोलणं किंवा कोणाला फसवणं टाळावं. अन्यथा शनिदेव कठोर दंड देऊ शकतात.

नवीन कामाची सुरुवात करू नका

शनि अमावस्येचा दिवस कठीण दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करणं टाळावं.

Rajyog 2025
Horoscope: होळीपासून 'या' राशींचे येणार अच्छे दिन; गजकेसरी राजयोगामुळे लागणार जॅकपॉट, वाढेल हुदा अन् पैसा

रात्री उशिरा बाहेर फिरू नका

अमावस्येच्या रात्री नकारात्मक शक्ती प्रबळ होतात. त्यामुळे या दिवशी रात्री श्मशानभूमी, स्मशान घाट किंवा निर्जन स्थळी जाणं टाळावं.

केस-नखं कापू नका

या दिवशी केस किंवा नखं कापल्याने जीवनात नकारात्मकता वाढते असे मानले जाते.

Rajyog 2025
Rajyog 2025: गजकेसरी आणि कलात्मक राजयोगामुळे फळफळणार 'या' राशींचं नशीब; उत्पन्नाचे नवे मार्ग होणार खुले

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com