Healthy Benefits Of Kokum : कोकम हे फळ भारताच्या पश्चिमी भागात अधिक प्रमाणात पाहायला मिळते. त्याला ग्रासिनिया इंडिका या नावाने देखील ओळखले जाते. हे आकारान लहान असले तरी आपल्या विशिष्ट चवीने भरलेले असते आणि सामान्यतः एक आंबट पदार्थाच्या स्वरुपात भारतात वापरले जाते.
हे फळ अनेक वर्षांपासून त्याच्या गुणकारी तत्त्वांमुळे आयुर्वेदिक औषधासाठी (Medicine) वापरण्यात आले आहे. याचे एक वैशिष्ट्य म्हणजे हे वजन कमी करण्यासाठी मदत करते.
कोकमात हायड्रॉक्सीसिट्रिक अॅसिड असते. जे शरीरात चरबीचे उत्पादन थांबवते आणि साठलेली चरबी घटवते. कोकम दाहनाशक गुणधर्मासाठी देखील ओळखले जाते. ते संधिवात आणि सुजेच्या त्रासापासून आराम देते. त्याच बरोबर त्यात असलेल्या अँटी-ऑक्सिडेंट्स शरीराला ऑक्सिडेटीव्ह तणाव आणि मुक्त रेडिकल्समुळे होणाऱ्या पेशीसंबंधीत नुकसानीपासूनही दूर ठेवतात.
कोकम सरबत हे भारतातील एक प्रसिध्द पेय आहे. जे खासकरुन उन्हाळ्याच्या दिवसात थकवा दूर करण्यासाठी प्यायले जाते. कोकम सरबत शरीराला उष्णतेपासून व हार्टस्ट्रोकच्या धोक्यापासून वाचवते.
पाहायला गेल तर उन्हाळ्याच्या दिवसांत येणारे हे कोकम शरीराला अनेक प्रकारे फायदेशीर आहे. जाणून घेऊया त्याचे इतर अनेक फायदे
कोकम खाण्याचे पाच फायदे जाणून घ्या
1. कोकम आपल्या शरीरातील भूकेला स्थिर करते. कोकमातील हायड्रॉक्सीसिट्रिक अॅसिड शरीरातील चरबी घटवते आणि कॉलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. त्याच बरोबर ते शरीरातील चरबी वितळवण्याचे ही काम करते.
2. कोकम eNOSला वाढवते आणि नो प्रोडक्शन उत्प्रेरीत करते. ज्यामुळे एंडोथेसियल डिसफंक्शन सुधारते, रक्तदाब सुरळीत करते. ज्यामुळे एथेरोस्क्लेरोसिस रोखण्यास परिणामकारक ठरते.
3. इलॅस्टेज नावाचे एन्झाईम आपली त्वचा लवचिक ठेवणारे इलास्टिनला हानी पोहोचवणाऱ्या इलॅस्टेजची प्रक्रिया रोखते. ज्यामुळे तुमची त्वचा तरुण राहण्यास मदत होते.
4. कोकममध्ये गार्सिनॉल अँटी-ऑक्सिडेंट आहे जे एच. पायलोरी बॅक्टेरियीविरुध्द कार्य करते आणि अल्सर-विरोधी प्रभावी ठरते.
5. कोकमात अँटि-ऑक्सि़ेंट्स असतात. जे लिपिड पेरोक्सिडेशन पासून प्रतिबंधित करतात. या गुणधर्मांमुळे कोकमात यकृत संरक्षणाची क्रिया घडते.
कोकमाच्या सेवनाने पचनक्रिया सुधारणे, जळजळ कमी करणे, वजन कमी करणे इत्यादी प्रकारच्या व्याधींपासून आराम मिळतो. भलेही कोकमचे उत्पादन भारताबाहेर होत असले तरी त्याचे सेवन करणे शरीरासाठी फायदेशीर आहे.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.