Samosa History : समोसा भारतात कसा आला? कोणत्या देशाचा मूळ पदार्थ? वाचा रंजक इतिहास

Samosa : समोसा! या नावानेच खरेतर तोंडाला पाणी सुटते. भारतातील सर्वच राज्यांमध्ये समोसा आवडीने खाल्ला जातो. कधी गोड-हिरव्या चटणीसोबत तर कधी चहासोबत समोसे खाल्ले जातात. चला तर मग रंजक इतिहास जाणून घेऊयात.
Samosa
Samosa HistorySAAM TV
Published On

आज समोसा सर्वाधिक विक्री केला जात असला तरी, तो मूळ भारतातील पदार्थ नाही. होय, हे वाचून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल. परंतू, तुम्ही कधी विचार केला आहे का, समोसाचा इतिहास काय आहे? भारतात समोसा बनवायला कधी सुरुवात झाली?

समोस्याचा उगम इराणचा आहे असे मानले जाते. तिथे त्याला 'संबुश्क' असे म्हटले जाते. पर्शियन इतिहासकार अबुल फजल बेहकी यांनी 11 व्या शतकात याचा प्रथम उल्लेख केला होता. असे म्हणतात की, समोसे प्रथम महमूद गझनीवाला दिले जाई. त्याकाळी समोस्यांमध्ये सुका मेवा, फळे वापरली जायची. मात्र, या समोस्याने त्रिकोणी आकार नेमका कधी घेतला? याचा स्पष्ट उल्लेख कुठेही आढळत नाही. सुरुवातीच्या काळात समोस्याला बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये 'सिंघाडा' म्हटलं जात होते.

समोसा स्वादिष्ट पदार्थ इराणमधून भारतात आला. उझबेकिस्तान आणि अफगाणिस्तानमार्गे सामोसाचा प्रवास झाला. असे म्हणतात की, अफगाणिस्तानमध्ये सुक्या मेव्यांऐवजी समोस्यांमध्ये मांस आणि कांद्याचा वापर केला जाई. पण, तिथून भारतात हा पदार्थ आल्यानंतर मात्र त्यात वापरले जाणारे स्टफिंग बदलले. शाकाहाराचा प्रभाव असल्याने स्टफिंगमध्ये बटाट्याचा वापर केला गेला. समोसा या पदार्थात काळानुरुप अनेक बदल झाले. हे एक असे फास्ट फूड आहे ज्यामध्ये कालांतराने बदल झाले. स्टफिंगमधल्या मांसाची जागा बटाटे आणि इतर भाज्यांनी घेतली. काळी मिरी आणि मसाले वापरले जाऊ लागले. पोर्तुगीजांच्या काळात समोस्यांमध्ये बटाटा वापरण्यास सुरुवात झाली असे म्हणतात.

Samosa
Pizza History : एकेकाळचं गरीबांचं खाणं असणाऱ्या पिझ्झाचा आज जगभरात दबदबा; काय आहे इतिहास?

भारतात समोस्यांचा मोठा व्यवसाय आहे. भारतात अनेक प्रकारचे समोसे प्रसिद्ध आहेत. त्यांपैकी बटाट्याचे स्टफिंग असलेला समोसा सर्वाधिक पसंत केला जातो. याशिवाय छोले, जाम, नूडल्स, फिश समोसा, पास्ता, पंजाबी आणि कीमा, चीज, मशरूम, फ्लॉवर, चॉकलेट, कांदा, चिकन, पनीर असा विविध प्रकाराचे समोसे प्रसिद्ध आहेत.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Samosa
Shravan Fasting : उपवासाला तुम्हीही खिचडी खाताय? आजारी पडण्याआधी वाचा डॉ.मृदुल कुंभोजकर यांनी सांगितलेला मोलाचा सल्ला

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com