Shravan Fasting : उपवासाला तुम्हीही खिचडी खाताय? आजारी पडण्याआधी वाचा डॉ.मृदुल कुंभोजकर यांनी सांगितलेला मोलाचा सल्ला

Fasting is Good or Bad : खिचडी आणि तळलेले पदार्ख खाल्ल्याने आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे डॉ. मृदुल कुंभोजकर यांनी उपवास म्हणजे काय? तसेच या दिवशी काय खावे आणि काय खाऊ नये याबद्दल माहिती सांगितली आहे.
Fasting is Good or Bad
Shravan Fast Saam TV
Published On

सध्या श्रावण सुरू आहे. श्रावणात अनेक व्यक्ती उपवास करतात. मात्र उपवास म्हणजे काय? याचा खरा अर्थ अनेकांना माहिती नाही. तसेच उपवासाला काय खावे आणि काय खाऊ नये हे देखील अनेक व्यक्तींना अद्यापही व्यवस्थित समजलेले नाही. उपवास म्हटला की सर्व व्यक्ती दाबून खिचडी आणि तळलेले पदार्ख खातात. मात्र त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे डॉ. मृदुल कुंभोजकर यांनी उपवास म्हणजे काय? तसेच या दिवशी काय खावे आणि काय खाऊ नये याबद्दल माहिती सांगितली आहे.

Fasting is Good or Bad
Masala Daliya Khichadi Recipe : स्वयंपाक करण्याचा कंटाळा आला? ट्राय करा मऊसुत दलिया मसाला खिचडी, पाहा रेसिपी

उपवास या शब्दाचा खरा अर्थ “देवाने दिलेल्या सर्व सुखसोई यांची परतफेड करण्यासाठी, काहीही न खाता, देवाला अर्पण केलेला एक दिवस”. आता “काहीही न खाता” हे सोडलं तर आपण व्यवस्थित उपवास करतो. पण, या उपवासात फायदा होण्याऐवजी त्रासच होतो. का बरं असं असेल?

उपवासाला खाणारे पदार्थ -

साबुदाणा खिचडी, शाबू वडे, राजगिरा, वेफर्स, फळांचे ज्यूस, रताळी, केळी, बटाट्याची भाजी, शाबू चिवडा, बटाटा चिवडा ई. हे पदार्थ हे सर्व सिंपल कार्बोहायड्रेट्स आहेत. म्हणजे पिष्टमय पदार्थ आहेत. याने फक्त रक्तातील साखरेवर परिणाम होतो.

श्रावणात तर याच पदार्थांवर येथेच्छ ताव मारला जातो. मग ज्या पदार्थांमुळे, शरीरात साखर वाढते, ते पदार्थ उपवासाला का खायचे? म्हणजे जर “साखर” शरीरात येणारच असेल तर तुम्ही “उपाशी” कसे? आणि हा उपवास फलित कसा होईल? या पदार्थांमध्ये कुठलेही जीवनसत्त्व नाहीत. त्यामुळे दिवसभर हे पदार्थ खाल्ल्याने देखील काही व्यक्तींना अशक्तपणा किंवा डोकेदुखी सारख्या समस्या जाणवतात.

त्यामुळे, आपण थोडं विज्ञान पाहूया

शरीराला आराम मिळावा म्हणून असतो तो “उपवास”..! आपल्या डायजेस्टीव ट्रॅकला थोडी विश्रांती देण्यासाठी “उपवास” (Fasting) असतो. त्यामुळे या श्रावणात थोडा सायंटिफिक उपवास करूया.

साबुदाणा खायचा नाही तर मग काय खायचं?

१. पनीर

२. ⁠शेंगदाणे - उकडलेले, खारे ई

३. ⁠काकडी

४. ⁠दही, चक्का

५. ⁠फळं (अख्खी), थोडी क्रीम किंवा साय (फळं नुसतीच खाऊ नये, त्यासोबत काहीतरी फॅटस् खावे त्याने शुगर स्पाईक होत नाही)

६. ⁠शेंगदाणे, खोबरं व खजूर लाडू

७. ⁠व्हे प्रोटीन शेक

८. ⁠व्हे प्रोटीन आणि चक्का (श्रीखंडासारखं)

९. ⁠ड्रायफ्रुट लाडू (गोडासाठी खजूर पेस्ट घालणे)

१०. ⁠दूध, व्हे प्रोटीन आणि काही ड्रायफ्रुट्स (काजू, मनुके नाही) घालून केलेला शेक.

या १० पदार्थांचा समावेश फक्त उपवासालाच नाही तर दैनंदिन जीवनात देखील करणे उत्तम राहिल. याने तुम्हाला एनर्जी मिळते, ब्लड शुगर स्पाईक होत नाही तसेच पोट सुद्धा भरलेलं राहतं. महत्त्वाची जीवनसत्त्वे मिळतात आणि मुख्य म्हणजे रक्ताशय वैगरे काही होत नाही.

त्यामुळे, “उपवास” चुकीचा नाहीये, उपवासाला “काय खायचं” हे महत्त्वाचं आहे.

Fasting is Good or Bad
Shravan Fasting Rules: श्रावणी सोमवारच्या उपवासाला काय खावे, काय खाऊ नये?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com