Khaman Dhokla Recipe : बॅचलर्स सुद्धा ५ मिनिटात बनवू शकतील अशी सिंपल ढोकळा रेसिपी; आजच ट्राय करा

Khaman Dhokla : मात्र याची परफेक्ट रेसिपी अनेक व्यक्तींना माहिती नाही. किंवा घरच्या घरी ढोकळा बनवायला घेतल्यावर तो फसतो. ढोकळा हवा तसा जाळीदार होत नाही. अथवा तो फार जास्त कोरडा राहतो.
Khaman Dhokla Recipe
Khaman Dhokla RecipeSaam TV
Published On

Recipe In Marathi :

महाराष्ट्रात अन्य राज्यातील खाद्यपदार्थ देखील आवडीने खाल्ले जातात. गुजरातमधील (Gujrat) संस्कृतीसह येथील पदार्थांनी महाराष्ट्रातील व्यक्तींच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. यातीलच एक सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे खमन ढोकळा. ढोकळा बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. नाष्टामध्ये ढोकळा खाणे अनेक जण पसंत करतात.

Khaman Dhokla Recipe
Best Food Cities Of India: भारतातील हे ५ शहर फूड लिस्टमध्ये टॉप, मुंबई कितव्या क्रमांकावर?

मात्र याची परफेक्ट रेसिपी अनेक व्यक्तींना माहिती नाही. किंवा घरच्या घरी ढोकळा बनवायला घेतल्यावर तो फसतो. ढोकळा हवा तसा जाळीदार होत नाही. अथवा तो फार जास्त कोरडा राहतो. मात्र परफेक्ट ढोकळा बनवण्याची रेसिपी फार सोप्पी आहे. रोज सकाळी काय नाश्ता बनवावा याचं गृहिणींना टेंशन असतं. त्यामुळे आज परफेक्ट खमन ढोकळा रेसिपी जाणून घेऊ.

साहित्य

बेसन - 3 वाट्या

हिरव्या मिरच्या ५ -७

कढीपत्ता - १०-१५

बेकिंग सोडा - १ टीस्पून

हळद - १ टीस्पून

साखर - १ टीस्पून

मोहरी - १ टीस्पून

हिरवी कोथिंबीर चिरलेली - १ कप

लिंबाचा रस - २ टीस्पून

तेल - २ चमचे

मीठ - चवीनुसार

कृती

आधी एक मोठी वाटी घ्या. त्यामध्ये बेसनाचे पीठ घ्या. देबसन पिठात पाणी टाकू नका. पाणी न टाकता दही मिक्स करून घ्या. पिठात चवीनुसार मीठ आणि हळद टाका. आता ढोकळा जास्त पिवळा दिसावा म्हणून तुम्ही हळद जास्त टाकत असाल तर तसे करू नका. जास्त हळद झाल्यास पदार्थाची चव कडवट लागते.

मीठ आणि हळद मिक्स केल्यावर आवश्यकतेनुसार त्यात पाणी टाका. पाणी टाकून या पिठात तयार झालेल्या गुठळ्या नीट फोडून घ्या. पिठाच्या गुठळ्या राहिल्यास त्या ढोकळा खाताना जवणातात. तयार मिश्रण एका भांड्यात काढून घ्या. तसेच किमान अर्धा तास झाकून ठेवा.

अर्धा तास झाल्यावर एका भांड्यात थोडे पाणी घ्या आणि उकळीसाठी गॅसवर ठेवा. तसेच पाण्याला उकळी येईपर्यंत तयार ढोकळा मिश्रणात खाण्याचा सोडा, बेकिंग पावडर किंवा फ्लेवर नसलेला इनो मिक्स करा. त्यावर एक चमचा पाणी मिक्स करा. पीठ थोडे फुलल्यावर उकळी आलेल्या पाण्यावर वाफवून घ्या.

ढोकळा शिजून थंड झाल्यावर त्याचे सुंदर काप करून घ्या. पुढे फोडणीची तयारी करा. यासाठी थोड्या तेलात मोहरी, जिरे आणि मिरचीचा मस्त तडका द्या. गोडवा यावा म्हणून यात साखरेचे पाणी मिक्स करा. आता ही फोडणी आणि साखरेचे पाणी ढोकळ्यावर टाकून घ्या. तयार झाला तुमचा खमन ढोकळा.

Khaman Dhokla Recipe
Vande Bharat Train Food: 'वंदे भारत ट्रेन'मधील जेवणात सापडलं झुरळ; प्रवाशाच्या तक्रारीनंतर IRCTC ने दिलं हे उत्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com