ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारतात खाद्य संस्कृतीला विशेष असे महत्त्व आहे.त्यामुळे अनेक परदेशी पाहुणे खाद्य संस्कृतीचा अस्वाद घेण्यासाठी भारतात येत असतात.
जगप्रसिद्ध ट्रॅव्हल आणि फूड गाईड टेस्ट अॅटलसे जगातील १०० शहरांची यादी तयार केली आहे.
त्यातील टॉप ५मध्ये असलेल्या भारतातील शहरांची नावे पाहूयात ज्यात भारतीय शहरे आणि त्यांच्या प्रसिद्ध पदार्थाबद्दल.
राजधानी दिल्ली हे शहर वेगवेगळ्या स्ट्रीट फूडसाठी खूप प्रसिद्ध आहे.
लखनौ हे अनेक प्रकारच्या बिर्याणी तसेच कबाब आणि कोरमा या खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहे.
चैन्नई शहरास विस्तृत असा समुद्र किनारा लाभलेला असल्यामुळे चैन्नई येथे फिश पासून बनवलेले खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहे.
मुंबई शहर सुद्धा स्ट्रीट फूडसाठी फेमस आहे परंतू त्यामध्ये गरमागरम मिळणारा वडापाव खूपच प्रसिद्ध आहे.
हैदराबाद शहरात मिळणारी बिर्याणी हैदराबादमध्येच नाही तर संपूर्ण देशात फेमस आहे.