सांगता काय! नोटांनी भरलेलं पाकीट तुम्हाला पाडतंय आजारी; मागच्या खिशात ठेवणं ठरू शकतं धोकादायक

मुलं फोन किंवा वॉलेट ठेवण्यासाठी पँटच्या मागच्या खिशाचा वापर करतात. आपल्यापैकी अनेकांना ही सवय असते. मात्र ही सवय तुमच्या पाठीच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
Keeping wallet your back pocket can be dangerous
Keeping wallet your back pocket can be dangeroussaam tv
Published On

गर्दीच्या ठिकाणी किंवा बाहेर असताना हातात काही सामान असलं की, आपण आपला फोन खिशात ठेवतो. मुलींकडे पर्स असल्याने अधिकतर मुलं फोन किंवा वॉलेट ठेवण्यासाठी पँटच्या मागच्या खिशाचा वापर करतात. आपल्यापैकी अनेकांना ही सवय असते. मात्र तुम्हाला माहितीये का, तुमची ही सवय तुम्हाला आजारी पाडतेय.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ही सवय दीर्घकाळ ठेवल्यास हाडांच्या किंवा पाठीच्या कण्याच्या समस्या अधिक प्रमाणात उद्भवू लागतात. वॉलेटमध्ये भरपूर पैसे किंवा क्रेडीट कार्ड भरून ठेवल्याने त्याचा आकार जाड होतो. हेच वॉलेट तुम्ही मागच्या खिशात ठेऊन बसलात तर तुमच्या पाठीच्या कण्याला त्रास होण्याची शक्यता असते.

फोन किंवा वॉलेट मागच्या खिशात ठेवण्याचे तोटे?

मुंबईच्या अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. आलोक पांडे म्हणाले की, जीन्स किंवा पॅन्टच्या मागच्या खिशात जड पाकीट घेऊन जाण्याच्या सवयीमुळे तरुणांना कंबर आणि पायांच्या गंभीर आजारांना बळी पडत आहे. पिरिफॉर्मिस सिंड्रोम नावाचा आजार होऊ शकतो. यामुळे कमरेच्या खालच्या भागात त्रास होऊ शकतो. कमरेत एक सायटीका नावाची नस असते. पाकिटाच्या वजनामुळे ही सायटीका नस दाबली जाऊ शकते. नस दाबल्याने कमरेत तीव्र वेदना जाणवतात.

डॉ. पांडे पुढे म्हणाले की, यामुळे ओस्टिओपॉरॉसिस होण्याचा धोकाही असतो. या आजारात व्यक्तीस तीव्र वेदना होतात. या आजारावर वेळीच उपचार न झाल्यास शस्त्रक्रिया करावी लागते. अनेकदा या समस्येकडे दुर्लक्ष केलं जातं. वेळीच उपचार न झाल्यास हिपचं दुखणं वाढते. त्यामुळे हा त्रास टाळण्यासाठी पॅन्टीच्या मागच्या खिशात पाकीट ठेवणं टाळा. हिप स्टेचिंगचा व्यायाम करा, एकाच जागी अधिक वेळ बसू नका.

डॉ. रिबेका यांच्या मते, पर्स मागील खिशात ठेवणं तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. मागच्या खिशात पर्स ठेवल्याने तुमच्या मणक्यावर ताण येतो. याशिवाय तुमच्या हिपची म्हणजेच नितंबांची स्थिती बदलू शकते. या गोष्टीमुळेही पाठी्च्या कण्यावर ताण येण्याची शक्यता वाढते.

डॉ. रिबेका पुढे सांगतात की, अशा स्थितीत दीर्घकाळ बसल्याने एका बाजूचे स्नायू स्टीफ म्हणजेच कडक होतात. तर दुसऱ्या बाजूचे स्नायूंवर अतिरीक्त ताण येऊ शकतो. ज्यामुळे वारंवार पाठदुखीही होऊ शकते.

Keeping wallet your back pocket can be dangerous
Y chromosome : बापरे! पुरुषांचं अस्तित्वच येणार धोक्यात? नव्या संशोधनातून धक्कादायक खुलासा

कसं ठेवालं तुमचं वॉलेट?

  • पँटच्या मागच्या खिशात वॉलेट ठेवण्यापेक्षा तुम्ही पुढील बाजूच्या खिशात ठेऊ शकता

  • वॉलेट खरेदी करताना कमी जाडी असलेलं वॉलेटं घ्यावं

  • तुमच्या वॉलेटमध्ये जास्त प्रमाणात पैसे किंवा कार्ड ठेऊ नका

  • बसताना वॉलेट खिशातून काढून बसलं पाहिजे

Keeping wallet your back pocket can be dangerous
Acupressure for Stomach Gas: वारंवार गॅसेसचा त्रास होतोय? 'हे' ४ एक्यूप्रेशरचे पॉईंट्स दाबल्याने मिळेल आराम

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com